ETV Bharat / city

Russia Ukraine Crisis : रशिया पुन्हा होऊ पाहतोय महासत्ता.. आगामी काळात भारताला मोजावी लागेल मोठी किंमत - रशिया युक्रेन युद्ध

रशिया आणि युक्रेन या दोन देशांदरम्यान युद्ध भडकले ( Russia Ukraine Crisis ) आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला ( Russia Attacked On Ukraine ) आहे. नुकतेच सुरु झालेल्या या युद्धाचे परिणाम भारतालाही भोगावे लागणार ( Russia Ukraine War Effects On India ) आहेत. याचविषयी सेवानिवृत्त कर्नल पटवर्धन यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. काय म्हणालेत पटवर्धन पाहुयात..

Russia Ukraine Crisis
रशिया पुन्हा होऊ पाहतोय महासत्ता.. आगामी काळात भारताला मोजावी लागेल मोठी किंमत
author img

By

Published : Feb 26, 2022, 10:27 AM IST

Updated : Feb 26, 2022, 1:37 PM IST

नागपूर - युक्रेनवर रशियात सुरू झालेल्या युद्धाचे ( Russia Ukraine Crisis ) गंभीर परिणाम अनेक देशांना येत्या काळात सोसावे लागणार आहे. भारतालाही याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे ( Russia Ukraine War Effects On India ) संरक्षण तज्ञ सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले. युद्धामुळे रशियाकडून कच्चे तेल आणि वायुसाठा मिळणे बंद झाल्यास याची कच्चा तेलाच्या किमतीत मोठी वाढ होईल. युक्रेनच्या मदतीला न गेलेल्या अमरेरिकेची नाचक्की झाली असली तरी, अमेरिकेला या उद्भवलेल्या परिस्थितीतही फायदा होणार असल्याचेही सेवानिवृत्त कर्नल पटवर्धन यांनी सांगितले. यासविस्तर विषयावर जाणूज घेऊ या खास रिपोर्टमधून..

रशिया पुन्हा होऊ पाहतोय महासत्ता.. आगामी काळात भारताला मोजावी लागेल मोठी किंमत

गॅस आणि युरेनियमचे साठे

युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरू झाले असले तरी यामागे रशियाचे राष्ट्रीय धोरण आहे. स्वतःचा देशाच्या सीमा चारही बाजूने सुरक्षित करणे हे मुख्य अजेंडा असून, दुसरे म्हणजे आपले वर्चस्व वाढवण्याचेही धोरण या युद्धामागे आहे. यात रशियाने युक्रेन लगतच्या क्रिमियावर 2014 मध्ये ताबा मिळवत स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. यात डॉननसेट भागातील दोन्ही राष्ट्रात मोठया प्रमाणात गॅस, तेल आणि युरेनियमचे साठे आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा त्यावर डोळा होता. यात अखंड रशिया निर्माण करण्यासाठी युक्रेनला रशियाच्या अधिपत्याखाली आणण्याचा खरा प्रयत्न असल्याचेही संरक्षण विषयाचे अभ्यासक कर्नल पटवर्धन सांगतात.

तिसऱ्या महायुद्धाची भीती

अमेरिका आणि नाटो देशांनी आपल्यामध्ये समाविष्ट करू पाहणाऱ्या युक्रेनला मदतीसाठी सैन्य न पाठवण्याचे निर्णयामुळे जगभारत एक प्रकारे नाचक्की होत आहे. या युद्धाचा परिणाम म्हणून युरोपला राशियामधून होणारा गॅस आणि तेल पुरवठा बंद पडण्याची शक्यता आणि भीती आहे. त्यामुळे नाटोचे सदस्य असलेल्या जपान आणि फ्रांसमध्ये या खदखद सुरू झाली आहे. यात हे युद्ध सुरू होऊन जेमतेम दोन दिवस झाले असून, आतापर्यंत केवळ 20 ते 22 किलोमिटरचा भूभाग रशियाने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे तूर्तास हे युद्ध थांबेल अशी चिन्ह नाहीत. दुसरीकडे युक्रेनला पूर्व पश्चिम आणि ब्लॅकसीच्या बाजूने घेरून मधात कोंडी करण्याच्या तयारीत रशिया आहे. पण युक्रेन जवळही न्यूक्लियर अस्त्र असल्याने तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त होत आहे. शिवाय तसे झाल्यास अनेक देशांना गंभीर परिणाम येत्या काळात दिसतील अशी भीती आणि चिंताही सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या निर्बंधाचा रशियावर परिणाम होणार?का? काय आहे रशियाचा प्लॅन बी..

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युद्ध सुरू होण्यापूर्वी युद्धाचे परिणाम लक्षात घेऊनच प्लॅन बी तयार ठेवला आहे. यात अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादल्यास युरोप रशियाकडून कच्चे तेल खरेदी बंद करू शकतो. त्यामुळे रशियाने आर्थिक कोंडी करण्याचा पर्यंत झाल्यास त्यावर उत्तर शोधून ठेवले आहे. राशियाने चीनसोबत 172 बिलियन डॉलरचे तेल आणि वायू खरेदीचा करार युद्ध सुरू करण्यापूर्वीचा केला आहे. जगातील इतर देशांना रशिया तेलसाठा विकत असल्याने त्याचा गंभीर परिणाम त्या देशांवर पडणार आहे. तसेच मोठा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहे.

भारतात तेलाचा किमती वाढतील..

भारतात आयात केले जाणारे 60 टक्के तेल हे रशियाकडून मिळत आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति बॅरल जवळपास सात ते 8 डॉलरने दोन दिवसात वाढले आहे. येत्या काही दिवसात हे प्रति बॅरल 40 डॉलरपर्यंत वाढून 140 ते 145 डॉलावर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे याचा मोठा फटका अनेक देशांचा अर्थव्यवस्थेला बसणार आहे. तेच भारत सौदी अरेबियापासून 40 टक्के तेल विकत घेते. या परिस्थितीत परिणाम स्वरूप सौदी अरेबिया सुद्धा तेलाचा दरात वाढ करणार असल्याने कच्चा तेलाच्या किमती वाढल्या की भारतात पेट्रोल इंधनासह महागाई मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

भारत रशियाचे संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता..

भारताने जर अमेरीकेच्या निर्बंधाना मानून रशियाकडून कच्चे तेल घेणं बंद केले तर रशियाकडून होत असलेल्या एस 400 मिसाईल आणि एअर डिफेन्स सिस्टम भारताला मिळणार की नाही हा प्रश्नही उभा ठाकला आहे. त्यामुळे भारताच्या संरक्षण ताकदीवर याचा परिणाम पडणार आहे. अगोदर ताणलेले संबंध अजून ताणले जाईल अशी भीती निर्माण झाली आहे. सध्या भारताची भूमिका जरी तटस्थ असली तरी युद्धाचे परिणाम भारतावर गंभीर आणि अर्थव्यवस्थेला गंभीर परिणाम देणारे ठरणार आहे.

चीनची बघ्याची भूमिका..

चीनचा राशियासोबत झालेला तेल आणि गॅस खरेदीचा करार पाहता चीन युद्धजन्य परिस्थितीत राशियाच्या बाजूने आहे. शिवाय चीन हा रशिया सोबत राहून अमेरिकेची गळचेपी करत एकटा पाडण्याच्या तयारीत आहे. अगोदरच अमेरिका आणि नाटो युक्रेनच्या मदतीला जाऊ शकत नसल्याने तोंडघशी पडले आहे. यांसोबतच चीन भविष्यात तायवानवर हल्ला केल्यास काय परिस्थिती उदभणार हे या युद्धाचा परिस्थितीवरून समजून घेत लक्ष ठेवून आहे. यासोबत तायवान हमला करताना भारताला दाबून ठेवण्यासाठी चीन लदाख सीमेवर घुसखोरी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेला फायदाच..

युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम मोठ्या प्रमाणात वायू आणि कच्च्या तेलाच्या खरेदी विक्रीवर होणार आहे. भारतालासह इतर देशांना मिळणारा कच्चा तेलाचासाठा रशियातून मिळणे बंद झाल्यास कच्चा तेलाची मागणी वाढणार आहे. याचा ताण सौदी अरेबियातून होणारा तेल साठ्यावर पडणार आहे. तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलाच्या किमतीतही वाढ झालेली असणार आहे. सौदी अरेबियामध्ये असलेल्या बहुतांश तेल कंपन्यांवर अमेरिकेचे वर्चस्व असल्यामुळे अप्रत्यक्षरीत्या याचा फायदा अमेरिकेला होणार आहे. जिथे इतर देशांना इंधन दरवाढीचा फटका अर्थव्यवस्थेला बसेल तिथे अमेरिके आर्थिक फायद्यात असेल असेही संरक्षण विषयाचे तज्ज्ञ मंडळी सांगतात.

Last Updated : Feb 26, 2022, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.