ETV Bharat / city

संघ मुख्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर.. जैश-ए-मोहम्मदकडून RSS मुख्यालय व परिसराची रेकी

नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून रेकी करण्यात (RSS headquarters targeted by terrorists) आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. सेंट्रल एजन्सीकडून पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालयासह (Rashtriya Swayamsevak Sangh) रेशीम बागमधील संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

RSS headquarters
RSS headquarters
author img

By

Published : Jan 7, 2022, 6:24 PM IST

Updated : Jan 7, 2022, 7:16 PM IST

नागपूर - नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून रेकी करण्यात आल्याची (RSS headquarters targeted by terrorists) खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. सेंट्रल एजन्सीकडून पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालयासह Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) रेशीम बागमधील संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार माहिती देताना

नागपूर हायअलर्टवर.. काश्मिरी तरुणाकडून नागपुरात रेकी

नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही त्यास दुजोरा दिला असल्याने नागपूरत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा - Malegaon Bomb Blast Case : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधातील साक्षीदाराने फिरवली साक्ष, ATS वर गंभीर आरोप

सेंट्रल एजन्सीकडून पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालयासह रेशीम बाग मधील संघाच्या डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारीच महत्वाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. आढावा घेऊन यात सुरक्षेची दृष्टीने आवश्यक पावले उचलली आहेत. पोलीस आयुक्तांनी नागपुरातील कोणत्या ठिकाणांची रेकी करण्यात आली याची माहिती दिली नाही. मात्र, या प्रकरणी युएपीए (UAPA)कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

काश्मीरी तरुणाला अटक -

जम्मू-काश्मीरमध्ये एका तरुणाला सेंट्रल एजन्सीला त्याच्याकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे नागपुरात रेकी झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील एका तरुण हा नागपुरात आला होता. जुलै 2021 मध्ये नागपुरात दोन दिवस वास्तव्यास राहिला. याकाळात काही स्थानांची रेकी केल्याची माहिती सेंट्रल एजन्सीकडून नागपूर पोलिसांना मिळाल्याचे सांगितले जात आहे.
त्यानंतर सर्व माहिती नागपूर पोलिसांनाही देण्यात आली आहे. यात पाकिस्तानीच्या सांगण्यावरूनच तरुणाने नागपुरात रेकी केली असल्याचे समोर येत आहे. यामुळे या अनुषंगाने केंद्रीय समितीकडून चौकशी सुरू आहे.

Last Updated : Jan 7, 2022, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.