नागपूर - कोरोनाच्या संकटामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदाच ऑनलाईन बौद्धिक वर्गाचे आयोजन केले आहे. 'वर्तमान परिस्थिती आमची भूमिका' या विषयावरील सरसंघचालक मोहन भागवतांचे प्रक्षेपण आज समाज माध्यमांमधून होणार आहे.
कोरोना विषाणुमुळे संपूर्ण जगावर संकट आले आहे. देशही उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करत आहे. सध्याची एकूणच स्थिती लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूरच्यावतीने अक्षय तृतीयेच्या निमित्ताने ऑनलाइन बौद्धिकवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन बौद्धिक वर्ग आज सायंकाळी ५ वाजता यु ट्युब आणि फेसबुकवर प्रसारित करण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट असताना सरसंघचालक काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा-लॉकडाऊनदरम्यान करा 'कुटुंब शाखे'चे आयोजन, आरएसएसचा सल्ला
दरम्यान, देशात टाळेबंदी असल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे देशभरातील अनेक उद्योग व व्यवसाय ठप्प आहेत. धार्मिक, राजकीय व संघटनांच्या जाहीर कार्यक्रमावर निर्बंध आहेत. त्यामागे कोरोनाचा संसर्ग टाळणे हा हेतू आहे.
हेही वाचा-चिनी मालावर बहिष्कार; स्वदेशी जागरण मंच सुरू करणार मोहीम
स्वदेशी जागरण मंचाने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची सुरू केली आहे मोहिम-
कोरोना चाचणीकरता देशात पाठविलेले किट हे सदोष निघाल्याने देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेला स्वदेशी जागरण मंच (एसजेएम) रविवारपासून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करणार आहे.