ETV Bharat / city

Kargil Vijay Diwas : राक्षसांनाही लाजवेल अशी पाकिस्तानी सैन्याची क्रूरता, निवृत्त कर्नलने सांगितल्या कारगिलच्या आठवणी

author img

By

Published : Jul 26, 2022, 9:58 AM IST

Updated : Jul 26, 2022, 11:41 AM IST

कारगिल युद्धातील कठीण ( Retired Colonel Patwardhan memories of Kargil ) प्रसगांना, भारतीय जवानांच्या शौर्याला आणि पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतींना नागपुरातील सेवा निवृत्त संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन यांनी त्यांच्या आठवणीत जिवंत ( Retired Colonel Patwardhan on pakistan army ) ठेवले आहे. पाकिस्तानचा क्रूर चेहरा केवळ भारतीय जवानांप्रति नाही तर त्यांच्याही जवानांप्रति पाहायला मिळाल्याच्या काही आठवणी आहे. या आठवणींना पटवर्धन यांनी उजाळा दिला.

Retired Colonel Patwardhan memories of Kargil
निवृत्त कर्नल पटवर्धन कारगिल आठवणी

नागपूर - शिस्त, कर्तृत्व, धाडस आणि देशाच्या सुरक्षेसाठी असणारी ( Retired Colonel Patwardhan memories of Kargil ) तत्परता यासाठी भारतीय सैन्याची देशात वेगळी ओळख आहे. आज कारगील विजय दिवस ( Retired Colonel Patwardhan on pakistan army ) आहे. या दिवशी 1999 मध्ये झालेल्या कारगील युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांचे स्मरण केले जाते. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानचे नापाक मनसुबे हाणून पाडले होते. घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी जवानांना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत त्यांना कंठस्नान घातले होते. या युद्धात भारताचा विजय झाला. हे युद्ध कठीण आणि आव्हानात्मक होते. पण सैन्याने ते शक्य केले. यावेळच्या कठीण प्रसगांना, भारतीय जवानांच्या शौर्याला आणि पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतींना नागपुरातील सेवा निवृत्त संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन यांनी त्यांच्या आठवणीत जिवंत ठेवले आहे. पाकिस्तानचा क्रूर चेहरा केवळ भारतीय जवानांप्रति नाही तर त्यांच्याही जवानांप्रति पाहायला मिळाल्याच्या काही आठवणी आहे. या आठवणींना पटवर्धन यांनी उजाळा दिला.

माहिती देताना कर्नल पटवर्धन

हेही वाचा - Nagpur Water crisis : पाईपलाईन लिकेजमुळे पाणी पुरवठा प्रभावित होण्याची भीती

भारतीय सैन्याचा शौर्याचा दिवस म्हणून 26 जुलै हा कारगिल दिवस आपण साजरा करतो. यात 527 जणांनी प्राणाची आहुती द्यावी लागली. कॅप्टन सौरभ कालिया यांना पाकिस्तानी सैन्य येत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली. त्यानंतर गस्तीवर त्यांचा सामना पाकिस्तानी सैन्याशी झाला. प्रचंड गोळीबारानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना चारी बाजूने घरून ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी युद्धाची माहिती घेण्यासाठी त्यांचा अतोनात छळ केला. त्यांचे डोळे फोडून टाकण्यात आले. हा छळ तब्बल 22 दिवस चालला. 22 दिवसानंतर जेव्हा मृतदेह स्वीकारण्याची वेळ आली त्यावेळी शरीराची पूर्ण चाळण झाली होती. सौरभ यांचे डोळे फोडून टाकण्यात आले होते. कान कापून टाकण्यात आले होते. शरीरावर सिगरेटच्या यातना होत्या. जखमा होत्या. एवढेच काय तर गुप्तांग सुद्धा कापून टाकण्यात आले होते. एवढा पाकिस्तानचा क्रूरपणा आणि यातना सोसणाऱ्याचे धैर्य जाट रंजिमेंटमधील सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.

पाकिस्तानने स्वत:च्या सैनिकांचे मृतदेह नाकारले - भारतीय सैन्याच्या हाती मृतदेह लागले तेव्हा याच युद्धा दरम्यान पाकिस्तानने त्यांच्याच मृत सैनिकांचे पार्थिव स्वीकारण्यास नकार दिला. त्याप्रसंगी लष्करी आचारसंहितेनुसार भारतीय सेनेने पाकिस्तानी सैनिकांचे बेवारस मृतदेह लष्करी सन्मान देत विहित इस्लामिक विधींनुसार दफन केले. त्यांची अवहेलना होऊ दिली नाही. इतका फरक भारतीय सैनिक आणि पाकिस्तानच्या सैन्यात पाहायला मिळाल्याची आठवण करून पटवर्धन यांनी करून देतात. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःच्या सैनिकांचे मृतदेह नाकारले होते. पाकच्या लाइट इन्फन्ट्रीचा कॅप्टन तैमूर मलिक हा अधिकारी त्याच्या दहा सैनिकांसह मारला गेला. परंतु, पाकिस्तानने त्यांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.

अजय आहुजा यांची कोल्ड ब्लडेड हत्या होती - स्कॉडर्न लीडर अजय अहुजा यांच्या विमानवर पाकिस्तानी सैन्याने मिसाईलने हल्ला चढवला. या परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी ते पॅराशूटने विमानातून बाहेर पडले. पण, एलओसी जवळ असताना वाऱ्याच्या प्रवाहामुळे पॅराशूट पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यावेळी त्यांना पकडण्यात आले. भारतीयांना जेव्हा त्यांचे शव परत करण्यात आले तेव्हा त्यांचा मृत्यू जमिनीवर पडून अपघाताने झाल्याचे सांगण्यात आले. पण, ते खरे नसून एक प्रकारे कोल्ड ब्लडेड हत्या होती. पोस्टमार्टम अहवालात त्यांच्या शरीरात गोळ्या आढळून आल्या. पाकिस्तानी मानसिकता दिसून आली.

भारतीय सैनिकांचा जगात मानसन्मान आहे - पाकिस्तानच्या मानसिकतेप्रमाणे चीनच्या सैन्याची मानसिकता गलवानमध्ये पाहायला मिळाली. भारतीय सैन्याला तिथे दगडाने ठेचून क्रूरपणे मारण्यात आले होते. त्यामुळे, ही मानसिकता केवळ पाकिस्तानी सैन्याचीच आहे असे नाही, तर चीनचीही अशाच पद्धतीची मानसिकता आहे. या विरुद्ध मानसिकता ही भारतीय सैन्याची आहे. त्यामुळे, शांती सेनेमध्ये सर्वाधिक सैनिक हे भारताचे असतात. कारण भारताचा सैनिक हा सहिष्णू आणि मानवीय विचार करणारा आहे. त्यामुळेच, भारतीय सैन्याचा मानसन्मान देशभरात होतो. न्याय देणारी सेना अशी ओळख असल्याचेही सेवानिवृत्त कर्नल पटवर्धन यांनी ईटीव्ही भारतच्या खास मुलाखतीत बोलताना सांगितले.

हेही वाचा - दारू विक्रीचा परवाना मिळवून देण्याच्या नावावर अनेकांची फसवणूक; पोलिसांकडून अटक

Last Updated : Jul 26, 2022, 11:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.