ETV Bharat / city

प्रजासत्ताक दिन विशेष: संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान - Republic Day 2021

आज 72 वा प्रजासत्ताक दिन सादरा होत आहे. या निमित्ताने संविधान निर्मितीच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारा ईटीव्ही भारतचा विशेष लेख...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
author img

By

Published : Jan 26, 2021, 5:00 AM IST

भारताला ब्रिटीश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचेमात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव 166 दिवसांसाठी खुला केला आणि 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या 308 सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला. आज 72 वा प्रजासत्ताक दिन सादरा होत आहे. या निमित्ताने संविधान निर्मितीच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारा ईटीव्ही भारतचा विशेष लेख...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सविंधान सभेत एकूण 296 प्रतीनिधी निवडल्या गेले-

भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेच्या निवडणुका 1946 मध्ये झाल्या. सविंधान सभेत एकूण 296 प्रतीनिधी निवडल्या गेले. संविधान सभेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांतातून निवडून आले होते. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते. संविधान सभेचे कामकाज 9 डिसेंबर, 1946 पासून सुरू झाले. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी नियुक्त करण्यात आली होती. मसुदा समितीमध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन.गोपालस्वामी अयंगार, के.एम. मुन्शी, सईद मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्तर आणि डी.पी. खेतान, असे एकूण 7 सदस्य होते.

संविधानाचा अंतिम मसुदा केवळ डॉ.आंबेडकरांनीच केला होता तयार -

30 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. मसुदा समितीत सात सदस्य असले तरी संविधानाचा अंतिम मसुदा केवळ डॉ.आंबेडकरांनीच तयार केला होता. हे प्रत्यक्ष संविधान सभेचे अध्यक्ष डॉ . राजेंद्र प्रसाद आणि संविधान सभेचे एक सन्माननीय सदस्य टी.टी. कृष्णम्माचारी यांनी संविधान सभेत स्पष्टपणे प्रतिपादन केले होते. संविधानाच्या मसुदा समितीमध्ये डॉ. आंबेडकरांची निवड ही किती सार्थक होती. याबद्दल संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांच्या प्रती ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यावरून दिसून येते.

डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता काम तडीस नेले-

डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणतात की, "या खुर्चीत बसून संविधान सभेच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. संविधान सभेच्या मसुदा समितीवरील सदस्यांनी किती उत्साहाने, चिकाटीने आणि निष्ठेने काम पार पाडले, याची खरी जाणीव अन्य कोणापेक्षाही मला अधिक आहे. विशेषत: त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता काम तडीस नेले आहे. मसुदा समितीवर आणि समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो निर्णय आपण घेतला त्याच्याइतका अचूक निर्णय दूसरा कोणताही घेतला नाही. त्यांनी आपल्या निवडीची यथार्थता पटवून दिली. इतकेच नव्हे तर त्यांनी जे हे कार्य केले. त्याला एक प्रकारचा तेजस्वीपणा आणला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांनी उत्साहाने संविधानाची जबबाबदारी पार पाडली-

संविधान सभेचे एक सन्माननीय सदस्य टी.टी. कृष्णम्माचारी, यांनी संविधान सभेत संगितले की, “अध्यक्ष महोदय, डॉ. आंबेडकरांचे या सभागृहात भाषण लक्ष देऊन ऐकणाऱ्या सदस्यांपैकी मी एक आहे. या संविधांनाचा मसुदा तयार करतांना त्यांना किती कष्ट सहन करावे लागले असतील. तरीही त्यांनी किती उत्साहाने ही जबबाबदारी पार पाडली. याची मला जाणीव आहे. पण त्याचवेळी हे संविधान जे आपणांकरिता एवढे महत्वाचे आहे. त्यावर मसुदा समितीने जेवढे लक्ष द्यावयास पाहिजे होते तेवढे दिले नाही. याची मला जाणीव आहे. या सभागृहाला याची जाणीव असेल की, याच सभागृहाने मसुदा समितीवर ज्या सात सदस्यांची नियुक्ती केली होती. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी दुसऱ्यांना नियुक्त करण्यात आले. एका सदस्याचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली. एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले आणि त्यांची ही जागा भरली गेलीच नाही. एक सदस्य राज्याच्या राजकारणात गुंतलेले होते. एक किंवा दोन सदस्य दिल्लीपासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती स्वास्थाच्या कारणास्तव त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. आंबेडकर हेच संविधानाचे शिल्पकार-

याचा अंतिम परिणाम असा झाला की, या संविधनाचा अंतिम मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्वपूर्ण काम निसंशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले. यात तीळमात्र शंका नाही. याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. ' यावरून हे स्पष्ट होते की, संविधान लिहिण्याचे आणि प्रत्येक कलमांवर विद्वतप्रचुर विश्लेषण करण्याचे कार्य हे फक्त डॉ. आंबेडकरांनी केले. म्हणून डॉ. आंबेडकर हेच संविधानाचे शिल्पकार असल्याचे संविधानसभेने मान्य केले होते.

हेही वाचा- विशेष : विविध योजनांपासून राज्यातील लाखो मुली वंचित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.