नागपूर - सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या कालच्या निर्णयाने इतर मागासवर्गीयांची निराशा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणारा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे हे आरक्षण टिकवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी नेत्यांनी आपले मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. लवकर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत समिती बनवून आणि स्वतंत्र ओबीसी आयोग नेमून गावपातळीवर जिल्हावार स्वतंत्र ओबीसी गणना करणे गरजेचे आहे. यासाठी गावपातळीवर सरकारची यंत्रणा उपलब्ध असल्याने ग्रामसेवक, तलाठी यांच्या साह्याने एक महिन्यात ही जनगणना सुद्धा होऊ शकते, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणारा - वडेट्टीवार - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या कालच्या निर्णयाने इतर मागासवर्गीयांची निराशा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणारा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.