नागपूर : नागपुरात शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. सायंकाळी सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. हवामान विभागाने आधीच पावसाचा इशारा दिला होता. दरम्यान, या पावसामुळे नागपुरकरांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे.
रबी पिकांना फटका
रबी पिकांच्या काढणीच्या हंगामातच अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांसाठी हा पाऊस नुकसानीचा ठरला आहे. गहू, हरभरा अशी पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. तर काही ठिकाणी सोंगणी झालेल्या पिकांच्या गंजी लावून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे अवकाळीच्या तडाख्याने या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - ...तर विश्वासघातकी महाविकास आघाडी विरोधात रस्त्यावर उतरणार - राजू शेट्टी