नागपूर - नागपूरात जिल्ह्यात चित्र बदलत असून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सात हजारांच्या सरासरीत पाच दिवसांत घसरण झाली आहे. मंगळवारी 4182 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 7 हजार 349 जणांनी कोरोनावर मात केले आहे. यामध्ये बाधितांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचा (3169) आकडा वाढत आहे. यात सक्रीय रुग्णांच्या संख्येत पाच दिवसांत 7 हजाराने घट झाल्याने आशादायी चित्र निर्माण होताना दिसून येत आहे.
चार दिवसांत 7527 ऍक्टिव्ह रुग्ण बरे
आज नागपूर जिल्ह्यात 19 हजार 468 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 4182 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागात 2498 तर ग्रामीण भागातील 1674 नविन बाधित रुग्णांची झाली आहे. तसेच 71 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरी भागात 40, ग्रामीण भागात 21 तर जिल्ह्याबाहेरील 10 जण कोरोनामुळे दगावले आहे. 7 हजार 349 जण कोरोनामुक्त झाले आहे. तर सक्रीय रुग्णसंख्येत पाचव्या दिवसात घट होऊन 76 हजार 726 वरून 69 हजार 199 वर पोहचली आहे. यामुळे मागील चार दिवसांत 7527 ऍक्टिव्ह रुग्ण बरे झाले आहेत.
पूर्व विदर्भात 11 हजार 447 कोरोनामुक्त
शुक्रवारी पूर्व विदर्भात 7 हजार 708 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 11हजार 447 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात बाधितांच्या तुलनेत 3 हजार 739 इतके रुग्ण बरे झाले आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील मृत्यूचा आकड्यात घट झाली आहे. तर मागील 24 तासत 140 जण दगावले आहे.
हेही वाचा - तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत एकही आरोप नाही - देशमुख