नागपूर - राज्यातील अनेक शहरात वाढत्या तापमानामुळे भीषण उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. यातच महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. विशेषत: मध्य नागपूर, पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपुरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut ) यांच्या शहरात मागील तीन दिवसंपासून संध्याकाळनंतर वीजपुरवठा खंडित ( Power outage Nagpur ) होत आहे. एकीकडे लोडशेडिंग नाही म्हणत असताना दुसरीकडे अखंडित वीज पुरवठासाठी सज्ज असल्याचा दावा करणारे वीज महावितरण ( MSEDCL ) त्यांच्याच शहरात फेल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Former Energy Minister Chandrasekhar Bawankule allegation ) यांनी नियोजचा अभाव असल्याने अघोषित भरनियमन सुरू असल्याचा आरोप केला आहे.
'या' आहेत अडचणी : मागील वर्षीच्या तुलनेत १०० मेगावॅट ६०० ते ६५० मेगावॅट एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे उष्णेतेने किंवा इतर कारणाने यंत्रणा नादुरुस्त होऊन एखाद्या ठिकाणाचा वीज पुरवठा बाधित झाला तर दुसरीकडून तो सुरळीत करण्यात येत होता. परंतु संपूर्ण यंत्रणेवर भार जास्त असल्याने नेहमीसारखे नियोजन करण्यास महावितरणला अडचणी जात असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
'ऊर्जा विभागात नियोजनचा अभाव' : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अघोषित भरनियमन सुरू आहे. यात व्होल्टेज मॅनेज होत नसल्याने अनेक ठिकाणी मागणी वाढत असल्याने कुठेतरी वीज कंपन्यांचे नियोजन चुकले आहे. त्यामुळे याचा परिणाम वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे. योग्य वेळी कोळसा नियोजन नसतांना कोळसा महाग झाला आणि याचा भार जनतेच्या अंगावर टाकण्यात आल्याचेही आरोप माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केला आहे.
'या' ठिकाणी झाला विद्युत पुरवठा खंडित : मंगळवारी महापारेषणच्या खापरखेडा येथील उपकेंद्रात वाढलेल्या वीज भारामुळे वेव्हट्रॅपच्या 220 किव्हो केंद्रावर लाईन बंद झाली. बुधवारी निर्मल नगर उपकेंद्रातून वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही क्षमतेच्या अंडरग्राउंड केबलमध्ये बिघाड झाल्याने पुरवठा खंडित झाला. बुधवारला उमरेडला जाणाऱ्या सिमेंटरोडवरील 8 ते 10 फूट खोल केबलमध्ये बिघाड झाला. गुरुवारी मानेवाडा, सोमवारी क्वार्टर भागातील वीज पुरवठा सुमारे एक ते दीड तास प्रभावित झाल्याचे वीज वितरणकडुन सांगितले जात आहे.