ETV Bharat / city

नागपुरात कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई - nagpur curfew latest news

संचारबंदी दरम्यान हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ विकण्याला परवानगी नाकारण्यात आली असताना देखील नागपुरातील काही हॉटेल्सकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचं आढळून आले आहेत.

nagpur
नागपूर पालिका
author img

By

Published : Mar 15, 2021, 3:43 PM IST

Updated : Mar 15, 2021, 4:37 PM IST

नागपूर - संचारबंदी दरम्यान हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ विकण्याला परवानगी नाकारण्यात आली असताना देखील नागपुरातील काही हॉटेल्सकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचं आढळून येतात. नागपूर शहर पोलीस दलाच्या उपायुक्त विनिता साहू यांनी सदर परिसरातील दोन हॉटल्सवर कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन्ही हॉटेल्स सील केले असल्याची माहिती डीसीपी विनिता साहू यांनी दिली आहे.

विनिता साहू - पोलीस उपायुक्त, झोन २

हेही वाचा - नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पोलीस आयुक्तांचा इशारा

नागपूर शहरात कोरोनाचा प्रतिबंधक कमी व्हावा या करिता संचारबंदी अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत एक ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिकांना जमा होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सोबतच शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, हॉटल्स आणि रेस्टॉरंटमधून ऑनलाइन फूड डिलिव्हरी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तरी देखील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूनम चेंबर या इमारतीत असलेल्या डोमिनोज आणि मॅक डोनाल्ड या दोन्ही हॉटेलमध्ये ग्राहकांना बसून सर्व्हिस दिली जात होती. या पार्श्वभूमीवर डीपीपी विनिता साहू यांनी दोन्ही हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

संचारबंदी दरम्यान ऑनलाइन फूड डिलिव्हरी सुरू:-

संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने कुठेही गर्दी होऊ नये या करिता प्रशासनाने हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला ऑनलाइन फूड डिलिव्हरी सर्व्हिस सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, आज नागपूर शहरातील काही भागात लपून काही हॉटेल्स आणि दुकानं सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे आता अश्या प्रतिष्ठानांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती डीसीपी विनिता साहू यांनी दिली आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Last Updated : Mar 15, 2021, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.