ETV Bharat / city

गोंदियात अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त - wine

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गोंदिया येथील अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली.

जप्त केलेली अवैध दारू
author img

By

Published : Feb 23, 2019, 1:54 PM IST

नागपूर - गोंदिया शहरात सुरू असलेल्या अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी अधिकाऱ्यांनी दारूच्या २५३ पेट्या जप्त केल्या असून त्याची किंमत २२ लाख रुपये आहे. तसेच ३ चारचाकी गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गोंदिया येथील अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी तेथे देशी दारू बॉटलींगच्या कारखान्यासह स्पिरीटचा मोठा साठा आढळून आलेला आहे. गोंदियातील मुरली रोड येथील बाजपेयी वार्डात हा व्यवसाय सुरू होता.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या अवैध कारखान्यातून २५३ पेट्या देशी दारूचा साठा जप्त केलेला आहे. चौकशीदरम्यान या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाम चातिरे आणि त्याचा भागीदार विजू पळून गेले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ए, बी, सी, डी, इ, एफ ८१, ८३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत २२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याठिकाणाहून ३ चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. त्या वाहनांचा उपयोग दारू तस्करीच्या कामाकरिता होत असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला आहे. तपासाला सुरुवात करण्यात आली असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

undefined

Intro:नागपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गोंदिया शहराच्या मुरली रोड येथील बाजपेयी वार्डात सुरू असलेल्या अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकून 253 पेट्या देशी दारूचा साठा जप्त केलाय.... जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 22 लाख रुपये असून या ठिकाणाहून तीन चार चाकी वाहन देखील जप्त करण्यात आले आहे या वाहनाच्या माध्यमातूनच दारू तस्करी केली जात असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला आहे

Body:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गोंदिया येथील अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली यावेळी तेथे देशी दारू बॉटलींग क्या कारखान्यासह स्पिरीटचा मोठा साठा आढळून आलेला आहे..... राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या अवैध कारखान्यातून 253 पेट्या देशी दारूचा साठा देखील जप्त केलेला आहे चौकशीदरम्यान या गुन्ह्यातील मुख्य आरोपी श्याम चातिरे आणि त्याचा भागीदार विजू नामक पळून गेल्याचं स्पष्ट झालाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ए,बी,सी,डी,इ,एफ 81,83 अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत 22 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे त्याठिकाणाहून 3 चार चाकी वाहन देखील जप्त करण्यात आले असून त्या वाहनांचा उपयोग दारू तस्करीच्या कामाकरिता होत असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला आहे त्या अनुषंगाने तपासाला सुरुवात झाली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे

महत्वाची सूचना- वरील बातमीचे व्हिडीओ आणि बाईट्स आपल्या एफटीपी अड्रेस वर सेंड करण्यात आलेले आहेत...धन्यवाद

(R-MH+NAGPUR-EXCIES-DEPARTMENT-READ-ILLEGAL-LIQUOR-FACTORY-IN-GONDIA-DHANANJAY)

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.