ETV Bharat / city

उपराजधानीत पाचव्या दिवशी लस उपलब्ध होताच केंद्रांवर उसळली गर्दी - nagpur corona news

नागपुरात मागील चार दिवसांपासून लसीकरण बंद होते. शनिवारी (दि. 3 जुलै) लस उपलब्ध झाल्याने लस घेण्यासाठी अनेकांनी लसीकरण केंद्राबाहेर गर्दी केली. यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते.

nagpur
गर्दी
author img

By

Published : Jul 3, 2021, 5:12 PM IST

Updated : Jul 3, 2021, 5:32 PM IST

नागपूर - नागपुरात मागील चार दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद होते. शनिवारी (दि. 3 जुलै) पाचव्या दिवशी लस उपलब्ध झाली. लसीकरण केंद्रात लस उपलब्ध झाल्याचे कळताच केंद्रावर मोठी गर्दी झाली. हा प्रकार चित्र रामनगरच्या तेलंगाखेडी केंद्रावर पहायला मिळाला.

आघावा घेताना प्रतिनिधी

शहरात चार दिवसांपासून म्हणजेच 29 जूनपासून लस उपलब्ध नव्हती. यामुळे नागरिक लसीच्या प्रतीक्षेत होते. यात शनिवारी (दि. 3 जुलै) लस उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच काहींना सकाळपासून केंद्रावर ऑफलाइन टोकण मिळण्यासाठी रांगा लावल्याचे दिसून आले.

लसीच्या तुलनेत गर्दी अधिक

शहरातील 140 केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू झाले आहे. पण, लसीचा पुरवठा न झाल्याने शहरात लसीच्या कुप्प्या संपल्याने नागरिकांना केंद्रावरून परत जावे लागले. यात अनेकांचे 90 दिवस म्हणजे तीन महिन्यांच्या कालावधी लोटला असल्याने वयोवृद्ध मात्र लसीच्या प्रतीक्षेत आहे. मोठ्या प्रमाणात सध्याच्या घडीला गर्दी ही वयोवृद्ध असलेल्या नागरिकांची दुसऱ्या डोजसाठीची होत आहे.

लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

यात लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीपेक्षा लस घेणाऱ्यांची गर्दी जास्त असल्याने सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमाला हरताळ फासताना दिसून आले. यात रुग्णालयाबाहेर सुरक्षारक्षक नसल्याने नियमांना तोडून ही गर्दी होती. तसेच लसीकरण केंद्रावर वयोवृद्ध नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था नव्हती. यातच नागरिकांनी वेळेची बुकिंग दुपारी केली असतानाही लवकर येऊन गर्दी केल्याचेही दिसून आले.

हेही वाचा - नागपुरात १२ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून मागितली ५० लाखांची खंडणी; दोन आरोपींना अटक

Last Updated : Jul 3, 2021, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.