नागपूर - दहावीमध्ये 87 टक्के गुण मिळाल्यानंतरही विज्ञान शाखेत न जाता तिने कला शाखेत जाण्याचा निर्णय घेतला. मला अनेकांनी मुर्खात काढले. पण तो निर्णय माझा होता, असे ठामपणे सांगणारी तनुजा वाघाडे हिने यंदाही कला शाखेमधून गुणवंत ठरली आहे. समाजासाठी काहीतरी करायचे आहे. त्यासाठी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी मार्ग हा यूपीएससीतून आहे. त्यामुळे कला शाखेत जाण्याचा निर्णय घेतला. तनुजा वाघाडे ( Tanuja Waghade ) ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयालयातून ( Dr. Babasaheb Ambedkar Vidyalaya Nagpur ) प्रथम आलेली बारावीची विद्यार्थिनी असून तिने कठिण परिस्थितीत रात्रभर अभ्यास करत आपल्या यशाचा मार्ग निर्माण केला आहे. बारावीचा नुकताच निकाल लागला आहे. यात तनुजाने 81 टक्के म्हणजे 600 पैकी 486 गुण मिळवले आहे. कठिण परिस्थितीवर मात करत तिने यश संपादन केले आहे.
तनुजाला समाजशास्त्र, इतिहास, आणि राज्यशास्त्र या विषयात विशेष रुची आहे. तिला लवकरच लॉमध्ये सुद्धा प्रवेश घ्यायचे असल्याचेही ती सांगते. सोबत यूपीएसीची परीक्षा देऊन समाजासाठी काही तरी करण्याची गाठच स्वतःशी बांधून घेतली आहे. तनुजाचे दोन रूमच छोटेसे घर आहे. यात ती तिची आई वडील, 10 वर्गात शिकत असलेला छोटा भाऊ असे चौघे छोट्याशा घरात राहतात.
वडिलांचा ऑटो बंद असतांना ट्युशन घेऊन कुटुंबाला आधार दिला : तनुजाचे वडील रमेश वाघाडे हे ऑटोचालक आहे. परिस्थिती जेमतेम आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करत दोन्ही मुलांना शिक्षण देण्यासाठी धडपड असते. परंतु कोरोनाच्या काळात त्यांनाही कठीण प्रसंगातून जावे लागले. ऑटोबंद असतांना घरात दोन वेळ खाण्याची वाणवा होती. यातच शिक्षणावर खर्च करणे अडचणीचे होते. या अडचणींवरही तिने मात केले. तनुजाने घराशेजारी राहणाऱ्या मुलाना ट्युशन द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडून मिळालेल्या पैशातून स्वतःला अभ्यासासाठी लागणारी पुस्तक पेन घेतले. अडचणीच्या काळात वडिलांना आधार देत स्वत:चा अभ्यासही पूर्ण केला.
दिवसा ट्युशन, रात्री बारावीचा अभ्यास : तनुजा अरुंद वस्तीतील कुंभार टोळीत राहते. तिथे दिवसभर काहींना काही आवाज असायचा. त्यामुळे तीला अभ्यास करायला कठीण जायचे. यातच ती घर खर्च भागवता यावा म्हणून ट्युशन देत असल्याने त्यासाठीचा वेगळा अभ्यास करावा लागत होता. सोबतच स्वतःचा 12 वर्गासाठीचा अभ्यास अशी दुहेरी कसरत तीला करावी लागायची. यातून तिने आपला मार्ग निवडत अनेक अडचणीवर सहज मात केली. रात्री जेव्हा सगळे घरात झोपले असल्याचे तेव्हा ती अभ्यास करायची. परीक्षेचा काळात ग्रंथालय तर कधी घरी अशा पद्धतीने अभ्यास करत कठीण परिश्रम आणि जिद्दीवर 81 टक्के मार्क मिळवले. यंदाही तिला 90 टक्क्यांच्या घरात मिळेल,अशी आशा होती. पण परिश्रम कमी पडले, असे तीला वाटते. पुढील काळात पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीचा टप्पा गाठायचा आहे. यासाठी तिची आता धडपड सुरू आहे.
हेही वाचा - सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर भांडी फेकण्याचा कट फसला.. भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात