नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी मार्च महिन्यात लागू केलेली टाळेबंदी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने पुढे कायम ठेवली. या दीड वर्षाच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहतुकीला अथवा संचार करण्यार नागरिकांना प्रामुख्याने बंदी घालण्यात होती. या कालावधीत राज्यातील रस्ते निर्मनुष्य असताना देखील नागपुरात वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केल्याची आकडेवारी समोर आली आहे. लॉकडाऊच्या काळात नागपूरमध्ये तब्बल ११ लाख नागपूरकरांनी वाहतुकीचे विविध नियम मोडल्याचे धक्कादायक आकडे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी या संदर्भात नागपूर शहर वाहतूक विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत महिती मागितली होती.
![नागपूरकरांनी तोडले वाहतुकीचे नियम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-05-rti-11-lakh-nagpurkar-broke-traffic-rule-during-lockdown-7204462_06072021230010_0607f_1625592610_414.jpg)
भरधाव वाहन चालक जास्तच-
या शिवाय वाहतूक सिग्नल तोडण्याच्या बाबतीत सुद्धा नागपूरकर मागे नाहीत. या दीड वर्षाच्या काळात ४९ हजार ३९८ वाहन चालकांनी सिग्नल तोडल्याची नोंद वाहतूक विभागात झाली आहे. पोलिसांनी या बेजबाबदार वाहन चालकांकडून ७५ लाख ६२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वेगाने गाडी पळवण्याच्या बाबतीत तर नागपूरकरांची गती जरा जास्तच दिसून येत आहे. १ जानेवारी २०२० ते ३१ मे २०२१ या काळात १३ हजार ९३९ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्या कडून १९ लाख ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
![नागपूरकरांनी तोडले वाहतुकीचे नियम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-05-rti-11-lakh-nagpurkar-broke-traffic-rule-during-lockdown-7204462_06072021230010_0607f_1625592610_515.jpg)
अशाच प्रकारे विविध हेड अंतर्गत ज्यामध्ये परवाना नसताना वाहन चालवणे, शांतता झोन मध्ये हॉर्न वाजवणे, गाडी चालवताना मोबाईलवर संभाषण करणे या कारणांसाठी ११ लाख ७ हजार ९९१ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या वाहन चालकांवर आकारलेला दंड हा २० कोटी ४४ लाख ७६ हजार ३०० इतका असून या पैकी ४ लाख ८९ हजार ७४० लोकांनी दंड अद्याप भरलेला नसल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
टाळेबंदीच्या दीड वर्षाच्या काळात २५५ लोकांचा मृत्यू:-
१ जानेवारी २०२० ते ३१ मे २०२१ या काळात शहरात ११२३ अपघात झाले,ज्यामध्ये २९१ लोकांचा मृत्यू झाला. या मध्ये २९ बस अपघात झाले ज्यामध्ये ०५ लोकांचा मृत्यू झाला तर ट्रक अपघाताची संख्या १०२ असून यामध्ये २०० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या शिवाय ३१६ कार अपघातात ५१ लोक मृत्यूमुखी पडले आहेत
![नागपूरकरांनी तोडले वाहतुकीचे नियम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-05-rti-11-lakh-nagpurkar-broke-traffic-rule-during-lockdown-7204462_06072021230010_0607f_1625592610_272.jpg)