ETV Bharat / city

राज्य सरकारच्या विरोधात भाजप ओबीसी सेलकडून आक्रोश आंदोलन - OBC Reservation Latest

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने सरकार विरोधात काल आक्रोश आंदोलन करण्यात आले होते.

भाजप ओबीसी सेलकडून आक्रोश आंदोलन
भाजप ओबीसी सेलकडून आक्रोश आंदोलन
author img

By

Published : Jun 4, 2021, 10:54 AM IST

नागपूर - ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करून राज्य सरकारने ओबीसीवर अन्याय केल्याचा आरोप करत भाजपच्या ओबीसी मोर्चा कडून काल नागपूरच्या संविधान चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य सरकारच्या विरोधात भाजप ओबीसी सेलकडून आक्रोश आंदोलन

'राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ओबीसी समाजवर अन्याय'

राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढला होता. मात्र ठाकरे सरकारने याकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे आज ओबीसी समाजाला आपल्या हक्का पासून वंचित राहावे लागणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात तब्बल दीड वर्ष सुनावणी झाली, मात्र याकडे राज्य सरकारने लक्षच दिले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ओबीसी समाजवर अन्याय होत असल्याचा आरोप सुद्धा आंदोलकांनी केला आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेल्या या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा विसर आंदोलकांना पडला होता. सुमारे ७० ते ८० आंदोलन एकत्रित आले होते. या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, त्यांनी देखील आंदोलकांना सामाजिक अंतर राखण्याचे निर्देश दिल्याचे दिसले नाही.

हेही वाचा - 'हे सरकार आहे की सर्कस आहे' - अतुल भातखळकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.