नागपूर - रविवारी आलेल्या पुणे वैदकीय शाळेच्या अहवालानुसार नागपुर जिल्ह्यात बीए 4 अँड बीए 5 या नवीन व्हेरिएंटचे चार रुग्ण हे नागपुर जिल्हातील असल्याचा अहवाल आला आहे. नागपुर जिल्ह्यात सध्याच्या घडीला 1233 कोरोना बधितांची नोंद झाली आहे. यातच सातत्याने दररोज दोनच्या वर कोरोना बधितांची भर पडत आहे. त्यामुळे धोका वाढत आहे. या सोबतच सध्या सर्वत्र सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण पाहायला मिळत आहे. यामुळे एकीकडे बदलत्या वातावरणामुळे व्हायरल तर एकीकडे स्वाईन फ्ल्यू यामुळे नागपूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली माहिती - नागपुर जिल्ह्यात २०२१ मध्ये स्वाईनफ्ल्यू ( Swine flu ) आजाराचे ६ रुग्ण आढळले. आता २०२२ मध्ये मागील काही दिवसात १४ रुग्णांची नोंद झाली आहे. पण यातील जास्तीत जास्त रुग्ण गेल्या काही दिवसात वाढले आहे. या १४ रुग्णांमध्ये १२ नागपूर जिल्हा, १ चंद्रपूर जिल्हा, १ छिंदवाडा येथील रुग्णाचा समावेश आहे. एकूण रुग्णांमध्ये १० पुरुष आणि ४ महिला आहेत. यातील 8 रुग्ण हे नागपुरातील खाजगी रुग्णलयात दाखल असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी ( Additional Municipal Commissioner Ram Joshi ) यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली. तर उर्वरित 6 रुग्णाची प्रकृती सुधारल्याने रुग्णांना घरी सोडले आहे.
संक्रमण रोखण्यासाठी काळजी घेण्याची गरज - स्वाईन फ्ल्यूचे संक्रमण झपाट्याने होत असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे या आजाराचे संक्रमण थांबवण्यासाठी आरोग्य विभाग सक्रिय झाला असल्याचे राम जोशी यांनी सांगितले. नागपूरच्या दोन्ही शासकीय रुग्णालयात त्या अनुषंगाने काळजी घेण्यासाठी तयारी आहे. पण अजून एकही रुग्ण हा शासकीय रुग्णालयात दाखल नाही. नागपूर विभागात 2009 मध्ये स्वाईन फ्लूचे सर्व प्रथम 45 रुग्ण समोर आले होते. 2010 मध्ये ही संख्या वाढवून 54 वर पोहचली. 2011 मध्ये 14 जणांचा मृत्यूची नोंद असून 2014 दरम्यान मृत्यूसंख्या कमी झाली. परंतु 2015 मध्ये स्वाईन फ्लूनेचा अचानक प्रकोप वाढला. त्यावेळी 790 रुग्णापैकी 179 रुग्णाचा मृत्यू झाला होता. तेच 2016 मध्ये 78 रुग्णांपैकी दोघाचा मृत्यू झाला होता. 2017 मध्ये 634 रुग्णापैकी 119 रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर 2018 मध्ये 63 रुग्णापैकी 11 जणाचा 2019 मध्ये 361 रुग्णांपैकी 39 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन वर्ष कोव्हिडं मध्ये गेल्याने एच1एन1 म्हणजेच स्वाईन फ्ल्यूची चाचणी झाली नाही. पण यंदा पुन्हा कोरोना रुग्णासोबत स्वाईन फ्ल्यू रुगवाढीने संक्रमणाची भीती पाहता काळजी घेण्याची अधिक गरज आहे.
हेही वाचा : Nagpur Corona Update : पालकांची चिंता वाढली! नागपुरातील एकाच शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण