नागपूर - मागील काळात विविध कारणांनी आगीच्या घटना घडत असताना यापासून कुठलाच धडा घेतला नसल्याचे चित्र नागपुरात पहायला मिळत आहे. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मोठ्या संख्यने रुग्ण जात असतात. यात मेयोतील एक अग्निशमक यंत्र मुदतबाह्य झाले असल्याचे समोर येत आहे.
क्षणानुसार बऱ्याच रुग्णालयांत अनेक त्रुटी - आग विझवण्याचे सिलेंडर असतांना मेडिकल कॉलेजमध्ये तर एका कंत्राटदार तर अर्धवट काम सोडून गेल्याने तिथेही असाच काहीसा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाईचे संकेत शासकीय मेडिकल कॉलेजकडून देण्यात आले आहे. भंडारा येथील शासकीय रुग्णालयाती दुर्घटनेननंतर सर्वत्र यंत्रणा खळबळ उडल्याने, शासनाने सगळ्या रुग्णालयांतील अग्निशमन अंकेक्षण केले. परंतु, या क्षणानुसार बऱ्याच रुग्णालयांत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.
नागपुरात अग्निशमन यंत्र मुदतबाह्य - काही पावले उचलत काही ठिकाणी काम झाल्याचे समोर आले. पण दुसरीकडे नागपुरात अग्निशमन यंत्र मुदतबाह्य असतांना बदलण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. हे यंत्र फेब्रुवारी महिन्यात मुद्दतबाह्य होऊन गेले. पण प्रशासकीय यंत्रणेकडून कशा पद्धतीने काम केले जात हे या उदाहरणावरून समोर येत आहे.
मेयोमध्ये तर अधिष्ठाता कार्यालयातील - शासकीय वैदकीय रुग्णालयात एका कंत्राटदाराने काही विभागात काम केले. पण योग्य पद्धतीने काम होत नसल्याने मेडिकल प्रशंसनाने त्याला गोष्टी सूनवल्यात. परंतु, त्यानंतर कंत्राटदाराने काम थांबवले. या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कारवाईचे संकेत मेडिकलच्या अधिकाऱ्यांकडून दिले जात आहेत. मेयोमध्ये तर अधिष्ठाता कार्यालयातील यंत्रही कालबाह्य झाले आहे. असताना कोणाचे लक्ष कसे काय गेले नाही यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेचस, रुग्णालयातील प्रशासकीय यंत्रणा किती दुर्लक्ष करतात याचाच हा नमुना आहे. पण दररोज येणाऱ्या हजारोच्या रुग्णाचा आणि त्यांच्या नाताईवाईक यांचा जीवाचा विचार करून सुरक्षेचे पाऊले उचलत काम करण्याची गरज आहे.
हेही वाचा - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मानसिक रोगी'; मोहन जोशी यांचे वादग्रस्त वक्तव्य