ETV Bharat / city

Nagpur Orange Alert : नागपूर जिल्ह्यात आज आणि उद्या ‘ऑरेंज अलर्ट’; अतिमुसळधार पावसाची शक्यता - orange alert for nagpur

भारतीय हवामान खात्याने ( Meteorological Department of India ) नागपूर जिल्हयात 8 ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ( heavy rainfall possibility in Nagpur ) वर्तवलेली आहे. हवामान खात्याने 8 ते 9 ऑगस्ट या दोन दिवसाकरिता ऑरेंज अलर्ट जाहीर ( orange alert in nagpur district ) केला आहे. या दोन्ही दिवसाला अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा ( high rainfall possibility in Nagpur ) दिलेला आहे. या दरम्यान पावसासोबतच वादळीवारा व वीज पडण्याची शक्यता ( storm, lightning possibility in nagpur ) देखील भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

Chance of heavy rain in Nagpur district
नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
author img

By

Published : Aug 9, 2022, 7:52 PM IST

नागपूर : भारतीय हवामान खात्याने ( Meteorological Department of India ) नागपूर जिल्हयात 8 ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ( heavy rainfall possibility in Nagpur ) वर्तवलेली आहे. हवामान खात्याने 8 ते 9 ऑगस्ट या दोन दिवसाकरिता ऑरेंज अलर्ट जाहीर ( orange alert in nagpur district ) केला आहे. या दोन्ही दिवसाला अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा ( high rainfall possibility in Nagpur ) दिलेला आहे. या दरम्यान पावसासोबतच वादळीवारा व वीज पडण्याची शक्यता ( storm, lightning possibility in nagpur ) देखील भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

Regional Meteorological Centre, Nagpur
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर

नागपूर जिल्ह्यातील मोठे धरण भरले: सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील मोठे धरण तोतलाडोह-88 टक्के, नवेगाव खैरी-99 टक्के, खिंडशी-96 टक्के, वडगाव- 100 टक्के क्षमतेने भरलेले आहे. मध्यम प्रकल्प जसे वेणा, कान्होली बारा, पांढराबोडी, मकरधोकडा, सायकी, चंद्रभागा, मोरधाम, केसरनाला, उमरी, कोलार, खेकडानाला व जाम हे 100 टक्के भरलेले आहे. या ठिकाणी सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील जवळपास सर्वच लघु प्रकल्प 100 टक्क्यांनी भरलेले असून त्या ठिकाणी देखील सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

orange alert in nagpur district
नागपूर जिल्ह्यात आज आणि उद्या ‘ऑरेंज अलर्ट’

मध्यप्रदेशमध्ये पाऊस, नागपूरला पुराचा धोका: पेंच नदीवरील मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात असलेले चौरई धरण देखील 85 टक्के भरलेले आहे. या कालावधीमध्ये छिंदवाडा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जिल्ह्यात 10 ऑगस्टला रेड अलर्ट देण्यात आले आहे. या कारणास्तव या कालावधीमध्ये चौरई धरणातून पाण्याचा अतिविसर्ग होऊन तोतलाडोह व नवेगाव खैरी या धरणांमध्ये अधिक पाणी येऊन पेंच आणि कन्हान नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे.

नागरिकांना सूचना: सद्यपरिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यक काळजी घेऊन स्वरक्षण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. अतिवृष्टी व वीजगर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील बहुतांश नदी व नाले दुथडी भरुन वाहत असून पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहनाद्वारे अथवा कोणत्याही पध्दतीने पूल पार करण्याचा प्रयत्न करू नये. या कालावधीत भारतीय हवामान खाते तसेच धरण क्षेत्रातील गावातील नागरिकांनी संबंधित विभागाकडून दिल्या जात असलेल्या सूचना, हवामानाचा अंदाज, चेतावणी, पाण्याचा साठा, पाण्याचा विसर्ग याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या शासकीय सूचनांचे पालन करण्यात यावे.

हेही वाचा- Independence Day: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव! वाचा महिला स्वातंत्र्याची 'ही' एक अनोखी कहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.