ETV Bharat / city

Devendra Fadnavis Criticized State Government : 'महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही'

author img

By

Published : Jan 27, 2022, 7:42 PM IST

थेट सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून घरोघरी ( Wine Sale in Supermarkets ) दारू पोहचवली जाणार आहे. या निर्णयावर बोलतांना महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

नागपूर - दारू विक्रीच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने ( Government of Maharashtra ) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे दारू किराणा दुकानांसह सुपर मार्केटमध्ये विक्रीला परवानगी ( Wine Sale in Supermarkets ) देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( Cabinet Meeting ) हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर विरोधकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे. पेट्रोल डिझेल स्वस्त करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती, मात्र महाराष्ट्र सरकारने दारू विक्रीचे नवीन परवाने देण्याचा निर्णय घेतला. आता तर थेट सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून घरोघरी दारू पोहचवली जाणार आहे. या निर्णयावर बोलतांना महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांनी दिली आहे.

शेतकरी, कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केलेली नाही. या काळात सरकारने केवळ दारूलाच प्राधान्य दिलेले आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? असा प्रश्न देखील देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेला आहे. सत्तेच्या नशेत धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा - Maha Govt Wine Sale Permission : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.