नागपूर हॅलो ऐवजी वंदे मातरम Vande Mataram म्हणण्याच्या ट्वीट वरून सध्या वाद निर्माण झाला आहे. यातच राज्याचे संस्कृतीक मंत्री यांच्या वंदेमातरम Vande Mataram म्हणण्याला रझा अकादमीने विरोध दर्शवला आहे. लोकशाहीमध्ये त्यांनी विरोध करावा आम्हाला मत परिवर्तन करायचे आहे.
वंदेमातरमला विरोध करणे म्हणजे संविधानाने दिलेल्या शब्दाला विरोध पण प्रयत्नपूर्वक काही शब्द रूढ होतात तसा वंदे मातरम Vande Mataram म्हणायला यात राजकारण करण्याच काही भाग नाही. संविधानाने त्याला राष्ट्रगानाचा दर्जा दिलेला आहे. वंदेमातरमला विरोध करणे म्हणजे संविधानाने दिलेल्या शब्दाला विरोध करण्यासारखा आहे असे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते नागपूरात माध्यमांशी बोलत होते. चिमूर दौऱ्यावर जाताना बोलत होते. 16 ऑगस्ट 42 ला घोषणा झाली चंद्रपूर जिल्हा Chandrapur District चिमूरला जिथे युनियन जॅक खाली उतरून झेंडा फडकवला होता. तीन दिवस तो भाग स्वातंत्र्यात राहिले. त्यानंतर त्या स्वातंत्र सैनिकांना फाशी झाली त्याना स्मरण करत त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर देशाने पुढे जावे यासाठी आजचा दिवस म्हणून चिमूर क्रांती म्हणुन स्मरण कार्याला जात असल्याचे मंत्री मुनगंटीवार Sudhir Mungantiwar म्हणालेत.
पंतप्रधान यांच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार मुनगंटीवार यांनी घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणार असे हे ठीक आहे. पण राजकारणातही की परिवारवाद चालतो असे होणार नाही. सत्तेत असतात गरीब हटावचा नारा द्यायचे पण करायचे काही नाही. परिवारवाद सांगण्यापेक्षा सामान्य माणसाला लोकशाहीत उच्च पदावर जाण्याची संधी असली पाहिजे. भाजपची हीच भुमिका होती. त्यामुळे गरीब कुटुंबात जन्मलेला एक व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहचते. अनुसूचित जमाती मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी द्रौपदी मुर्म Draupadi Murma या देशाच्या राष्ट्रपती आहेत असे म्हणत पंतप्रधान यांच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा सवाल वंदे मातरमचा अर्थ या भूमीला नमन करणे असा आहे याला जर कोणी विरोध दर्शला असेल तर लोकशाही आहे. 26 जानेवारी पर्यंत अभियान राबत त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मंत्री मुनगंटीवार म्हणाले. वंदे मातरम हा राजकीय किंवा जातीय शब्द नाही. यात शिवसेनेचा काय मत आहे किंवा कोणत्या पक्षाचा काय मत आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचे नाही. माझ्या दृष्टीने बोलतांना वंदे मातरम म्हणण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुनगंटीवार म्हणालेत. यावेळी वंदे मातरम म्हटले नाही तर तुम्ही आम्हाला जेल मध्ये टाकणार का असा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी केला होता. याला उत्तर देतांना म्हणाले की मी हॅलो या शब्दला पर्यांयी हा शब्द वापरण्याची सवय करावी. त्यामुळे यात एवढ्या मोठ्या गोष्टी करण्याचे काही कारण नाही.
स्वतचीच निंदा करण्यासारखा प्रकार असल्याचा टोला महाविकास आघाडी सरकार असतांना शिवसेनेकडे जी खाती होती साधारणत तेच खाते आता शिंदे गटाच्या सेनेकडे आहे. भाजपने महत्त्वाचे खाते घेतले असे म्हणणे योग्य नाही. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीकडे जी खाते होती ती आम्ही घेतलेली आहेत. शिवसेनेने यावरती टीका करणे म्हणजे स्वतची राजकीय भूमिका नसून स्वतचीच निंदा करण्यासारखा प्रकार असल्याचा टोला शिवसेनेला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. लोकशाहीत एक विरोधी पक्ष अपेक्षित आहे.
काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार यंदा 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत त्यापार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त आता महाराष्ट्राचे नवनियुक्त सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंधेला मोठी घोषणा केली आहे यापुढे सरकारी कार्यालयामध्ये अथवा सरकारी कर्मचाऱ्यांना फोनद्वारे संवाद साधताना हॅलो नाहीतर वंदे मातरमने संभाषणाला सुरुवात करावी लागणार govt employees to start teleconversation with Vande Mataram आहे. लवकरच त्याबाबत आदेश काढण्यात येणार आहे अशी माहिती सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी केली आहे.
हेही वाचा Bihar Cabinet expansion बिहारमधील नवीन मंत्रिमंडळाचा आज विस्तार हे आमदार होणार मंत्री