ETV Bharat / city

जेवणाच्या वादातून झोपलेल्या मित्रांवर हमालाचा हल्ला; डोक्यात हातोड्याचे घाव घालून केला खून - कोरोना

संस्थेकडून भोजनदान दिले, त्यावेळी विनोद मोखे नावाचा हमाल पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे विनोदने शेजारी जेवण करत असलेल्या लालचंद आणि कंडक्टर नामक दोन सहकारी हमालांकडे पुरी भाजी मागितली. तेव्हा विनोदाला त्या दोघांनी ले भिकारी पुरी ले असे म्हटल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर विनोदने. . . .

Murd
मृत लालचंद मेंढे
author img

By

Published : May 18, 2020, 11:38 AM IST

नागपूर - जेवणाच्या वादातून हमालाने झोपलेल्या मित्रांच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून एकाचा खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना लकडगंज परिसरात शनिवारी रात्री घडली. लालचंद मेंढे असे मृत हमालाचे नाव असून विनोद मोखे असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर कंडक्टर नावाचा हमाल गंभीर जखमी आहे.

घटनास्थळ

लकडगंज परिसरात अनेक व्यापाऱ्यांचे मोठ-मोठे गोडाऊन आहेत. दिवसभर आलेले ट्रक रिकामे करण्यासाठी त्या भागात मजूर आणि हमलांची मोठी गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने लकडगंज भागात अनेक सेवाभावी संस्थाकडून शिजलेले अन्न वाटप केले जात आहे. शनिवारी रात्री सुद्धा एका संस्थेकडून भोजनदान दिले, त्यावेळी विनोद मोखे नावाचा हमाल पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे त्याला जेवण मिळाले नाही, म्हणून विनोदने शेजारी जेवण करत असलेल्या लालचंद आणि कंडक्टर नामक दोन सहकारी हमालांकडे पुरी भाजी मागितली. तेव्हा विनोदाला त्या दोघांनी ले भिकारी पुरी ले असे म्हटल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यांच्यात हाणामारी सुद्धा झाली. हा वाद पोलीस ठाण्यात गेला असता पोलिसांनी दोन्ही पक्षाची समजूत घालून परत पाठवले होते.

Murd
आरोपी विनोद मोखे

सारे काही ठिक झाले असताना लालचंद मेंढे आणि कंडक्टर झोपी गेल्यानंतर विनोदने दोघांच्या डोक्यावर हतोड्याने वार करून थेट पोलीस ठाणे गाठले. दोघांची हत्या केल्याची कबुली विनोदने दिल्यानंतर पोलिसांनी थेट घटनास्थळावर धाव घेतली. तेव्हा लालचंदचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर कंडक्टर गंभीर जखमी असल्याचे दिसून आले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी विनोदला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास लकडगंज पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.