नागपूर - कुख्यात राजा गौस टोळीचा सदस्य असलेला गुंड शोएब सलीम खान यांने कारागृह अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर कारागृहातच प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (Shoaib Salim Khan attacks officials) अचानक झालेल्या हल्यात हेमंत इंगोले जखमी झाले आहेत. कारागृहातील कर्मचारी आणि अन्य कैद्यांच्या मदतीने शोएब सलीम खानला आवरण्यात आले.
धंतोली पोलीस ठाण्यात शोएब सलीम खान विरुद्ध गुन्हा दाखल
कुख्यात राजा गौस टोळीचा सदस्य असलेला गुंड शोएब सलीम खान यांने कारागृह अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर कारागृहातच प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अचानक झालेल्या हल्यात हेमंत इंगोले जखमी झाले आहे. कारागृहातील कर्मचारी आणि अन्य कैद्यांच्या मदतीने शोएब सलीम खानला आवरण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याची धुलाई करण्यात आल्याने तो थेट रुग्णालयात पोहचला आहे. हेमंत इंगोले यांच्या तक्रारीकरून धंतोली पोलीस ठाण्यात शोएब सलीम खान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक झाल्यानंतर स्वतंत्र्य बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते
सात वर्षांपूर्वी राजा गौस आणि त्याच्या चार साथीदारांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहाची अभेद्य सुरक्षा व्यवस्था भेदून पळ काढला होता. गुंड शोएब सलीम खानला 2013 पासून मकोका कायद्याच्या अंतर्गत कारागृहात कैद आहेत.त्याने 2015 साली राजा गौसच्या मदतीने जेल ब्रेक केली होती. त्याला अटक झाल्यानंतर स्वतंत्र्य बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचा राग मनात धरून शोएब सलीम खानने तृरुंग अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर हल्ला केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
काही तरी मोठं करण्याची होती तयारी ?
काही दिवसांपूर्वी शोएब सलीम खानच्या बॅरेकची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात धारधार तार आणि काही आक्षेपार्ह साहित्य मिळून आले होते. त्यामुळे तो पुन्हा काही तरी मोठे करण्याच्या तयारी होता या शंकेला वाव असल्याने जेल अधिकाऱ्यांनी त्याची सखोल चौकशी केली होती. त्या रागातून शोएब सलीम खानने हेमंत इंगोले यांच्यावर हल्ला केला आहे.
हेही वाचा - Sharad Pawar on Nawab Malik : 'सरकार विरोधात जाहीर भूमिका मांडणाऱ्यांना त्रास दिला जातोय'