ETV Bharat / city

विशेष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दीक्षाभूमीवर 'नो एन्ट्री'

नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती तर अतिशय भीषण झालेली असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कुणालाही दीक्षाभूमीवर प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार दीक्षाभूमीचे प्रवेश द्वार बंद करण्यात आले आहे.

no-entry-on-diksha-bhoomi
no-entry-on-diksha-bhoomi
author img

By

Published : Apr 14, 2021, 12:26 AM IST

नागपूर - यावर्षी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती घरून साजरी करावी, असे आवाहन दीक्षाभूमी स्मारक समितीकडून करण्यात आले आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात आणि राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ज्यामुळे रुग्ण संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती तर अतिशय भीषण झालेली असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कुणालाही दीक्षाभूमीवर प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार दीक्षाभूमीचे प्रवेश द्वार बंद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी सुद्धा कोरोनामुळे बाबासाहेब आंबेडकर जयंती त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या कार्यक्रमांसह अनेक आयोजन रद्द करण्यात आले होते, या वर्षी सुद्धा परिस्थिती बदललेली नसली तरी आणखी भीषण झालेली असल्याने याही वर्षी दीक्षाभूमीवर आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दीक्षाभूमीवर 'नो एन्ट्री'

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची यावर्षी १३० वी जयंती आहे. मात्र देशावर ओढवलेल्या कोरोना परिस्थितीमुळे महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांना दीक्षाभूमीत येता येणार नाही. गेल्या वर्षी सुद्धा आंबेडकरी अनुयायांना जयंती किंवा इतर उत्सव साजरे करता आले नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आंबेडकरी जनतेने अभूतपूर्व संयम दाखवला आहे. याही वर्षी संयमाचा परिचय द्यायचा असल्याने सर्वांनी आपल्या घरूनच बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन दीक्षाभूमी स्मारक समितीकडून करण्यात आले आहे.
पदाधिकारी करणार माल्यार्पण -
१४ एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना दीक्षाभूमीवर प्रवेश नसला तरी दीक्षाभूमी स्मारक समितीचे निवडक पदाधिकारी भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर अस्थी कलशाला पुष्प अर्पण करतील. या शिवाय इतर कुठल्याही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले नसल्याचे विलास गजघाटे यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.