ETV Bharat / city

नागपुरातील मॉलमध्ये अजूनही शुकशुकाटच; फुटपाथवर मात्र ग्राहकांची गर्दी - मॉल गर्दी बातमी

शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणासाठी महानगरपालिका शर्तीचे प्रयत्न करत आहे. मात्र, फुटपाथवरील वाढलेली गर्दी प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरत आहे.

mall
नागपुरातील मॉलमध्ये अजूनही शुकशुकाटच
author img

By

Published : Sep 18, 2020, 5:48 PM IST

नागपूर - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानंतर बाजारपेठाही खुल्या करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वीच नागपुरात सम विषम नियम रद्द करत शहरातील बाजारपेठा पूर्णतः खुल्या झाल्या. आता रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने नियमित सुरू आहेत. त्यामुळे फुटपाथवर ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचे पहायला मिळत आहे. तर दुसारीकडे नागपुरातील विविध मॉलमध्ये शुकशुकाट दिसत आहे. अशातच वाढलेली गर्दी संसर्गाला आमंत्रण देणारी ठरत आहे. तर, मॉलमधील शुकशुकाटामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे.

नागपुरातील मॉलमध्ये अजूनही शुकशुकाटच

हेही वाचा - '...तर भविष्यात मराठ्यांची ताकद राज्य सरकारला धुळीस मिळवेल', मराठा समाज आक्रमक

अनलॉकनंतर दुकाने नियमितपणे सुरू झाली. मात्र, दुकानांमधील ग्राहकांची गर्दी फारच तुरळक झाली आहे. नागपुरात अशीच काही स्थिती पहायला मिळत आहे. दुकाने सुरू झाली असली तरी खरेदीसाठी ग्राहक फुटपाथवर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बर्डीत रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या फुटपाथांवर नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका अधिक उद्भवत आहे. तर, दुसरीकडे शहरातील विविध मॉल्समध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ऐरवी मॉलमध्ये नागरिकांची मोठी गर्दी असते. परंतु, अनलॉकनंतरही मॉल्समधे शांतता दिसून येत आहे. याचा फटका मॉल्सच्या अर्थकारणावर होत असल्याचे चित्र आहे.

शिवाय अनलॉकनंतर मॉल्स सुरू होवूनही जर ग्राहकच नसतील तर मॉल सुरू करून काय करायचे? असा प्रश्न या मॉलच्या व्यावसायिकांना पडला आहे. नागपूर महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच शहरातील सम विषम नियम रद्द केला होता. त्यानंतर पूर्णवेळ शहरातील दुकाने सुरू करण्याची मुभाही देण्यात आली. मात्र, अनेक दुकानांमध्ये शुकशुकाटच आहे. परंतु, फुटपाथवर असणाऱ्या दुकानांवर मात्र ग्राहक गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. याच गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढत असल्याचेही पहायला मिळत आहे.

शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणासाठी महानगरपालिका शर्तीचे प्रयत्न करत आहे. मात्र, फुटपाथवरील वाढलेली गर्दी प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरत आहे. त्यामुळे शहरातील वाढता कोरोना आकडा नियंत्रणासाठी शासनाकडून या गर्दीवर ठोस पाऊलं उचलणे गरजेचे असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे फुटपाथवरील वाढत चाललेली गर्दी महानगरपालिका प्रशासन कशा पद्धतीने रोखू शकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.