नागपूर - महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हे देशात महत्वाचे शहर आहे. याच नागपूरचे रहिवासी असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 27 मे वाढदिवस. देशभरात लाखो किलोमीटरचे रस्त्याचे जाळे विणणारे भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारखे रस्ते असतील असा दावा करणारे गडकरी यांचा जन्म नागपूरच्या महालात झाला. त्याच अरुंद गल्ली बोळीत त्याचं बालपण गेलं. पण देशभरात केलेल्या कामामुळे देशात 'रोडकरी' अशी ओळख त्यांना मिळाली. जाणून घेऊन महालाच्या गल्लीपासून दिल्ली पर्यंतचा प्रवास या ईटीव्ही भारतच्या खास रिपोर्ट मधून.
नितीन गडकरी यांचा वाढदिवस, संग्रहित छायाचित्र
अमेरिकेतील रस्ते चांगले म्हणून श्रीमंती - केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे एक वाक्य नेहमी सांगतात. अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत. तर, अमेरिका श्रीमंत आहे कारण तिथे चांगले रस्ते आहेत. त्यामुळे 2024 च्या अखेरीस भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे असतील असे ते अनेकदा भाषणातून बोलून दाखवतात. पण आज केंद्रसरकारमधील ताकदवर मंत्री अतिशय लोकप्रिय देशाच्या काना कोपऱ्यात अशक्य ते सगळे रस्त्याचे काम शक्य करून दाखवणारे नेते म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. पण त्यांचा राजकीय प्रवास मजेदार पद्धतीने सुरू झाला. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात ते वाढले. पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून 1980 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. पण इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या घोषणेनंतर अनेक किस्से आजही जुनी मित्र मंडळी सांगतात. इंदिरा गांधी यांचे पोस्टर महालाच्या गल्लीतील लावणे असो की, टॉकीजमध्ये बालकनीचे तिकीट काढून आणीबाणीच्या घोषणा देत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होणारे गडकरी मोजक्याच लोकांना माहीत आहेत. आज त्यांच्या दौऱ्यात पोलीस संरक्षण देणारे असतील पण अनेकदा पोलिसांच्या दांडक्याचा प्रसाद खाल्लेला आहे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही पण गडकरी यांनी असे अनेक किस्से सांगितले आहेत. नितीन गडकरी यांचा वाढदिवस, संग्रहित छायाचित्र
बांधकाम मंत्री होत रोडरी झाले - नितीन गडकरी 1995 मध्ये भाजप शिवसेना पक्षाचे सरकार असताना बांधकाम मंत्री झाले. त्यांनी पाच वर्षात अनेक महत्वाची कामे केली. यातील मुंबई पुणे हे अंतर गतिशील करण्याचे योगदान महत्वाचे राहिले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सलग चारवेळा विधानपरिषदमध्ये ते निवडणून गेले. याच काळात त्यांच्या दूरदृष्टीने आणि भविष्यातील गरजा ओळखण्याचे कसब पाहायला मिळाले. भविष्यातील इंधन समस्या ओळखून त्यांनी अनेक वर्षांपासून काम केले. याच काळात त्यांनी 55 पेक्षा अधिक पूल बांधले त्यामुळे शिवसनेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना 'रोडकरी' असे संबोधले होते.निवडणुकामध्ये यश - सुरवातीपासून त्यांनी पक्षसंघटनाच्या कामावर अधिक लक्ष दिले. 2004 मध्ये ते भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी 2009 ते 2013 या काळात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले. त्यावेकी सर्वात युवा राष्ट्रीय अध्यक्ष आणि दुसरे मराठी अध्यक्ष अशी नोंद आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचा 2014 च्या निवडणुकीत 2 लाख 84 हजार 868 मतांनी पराभव केला. त्यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय भाजपच्या मोदी सरकारमध्ये दिला आहे. तेच 2019 मध्ये काँग्रेस नाना पटोले यांचा 2 लाख 16 हजार मतांनी पराभव केला होता.सध्याच्या घडीला ईडीच्या करवाई गाजत आहे. नितीन गडकरी यांनाही 2012 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतांना पूर्ती उद्योग समूहाची इडिकडून झालेल्या चौकशी समोर जावे लागले. तेवढे एक प्रकरण सोडता त्यांच्या राजकीय कारकीर्द ही स्वच्छ राहिली आहे.
महालातील अरुंद रस्ते - यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते बांधून पाडलेली कामाची छाप देशाच्या विकासात भर घालणारी आहे. अनेक किस्से त्यांच्या भाषणातून ऐकायला मिळतात. दुसरे म्हणजे लाख आणि करोड नाही तर हजारो कोटीचे काम करण्याचे त्यांचे कौशल्य नेहमी चर्चेत असते. जिथे केंद्रातील अनेक मंत्रालायाकडे पैसे नसतात. तिथे त्याच्याकडे सर्व कामे हजारो कोटीचे असतात. पण याच भाषणात नागपुरात त्यांनी दुःख व्यक्त करत सांगितले. देशभरात भलेही लाखो किलोमीटर रस्ते बांधले पण स्वतःच्या महालाच्या घराच्या दिशेने जाणारा रस्ता राजकीय कारकिर्दीत अनेक प्रयत्न करून बांधू शकलो नाही असेही एक भाषणात बोलताना सांगितले. त्यामुळे महालातील गडकरी यांचे अरुंद रस्त्यावरील घर आणि गल्ली ते दिल्लीचा प्रवासात अनेक प्रसंग आहे. विशेष म्हणजे यातील अनेक प्रसंग ते बोलून दाखवतात.