नागपूर - माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे देशाचे, सरकारचे आणि भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून ओळख मिळवली. हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. एक राजकीय नेता, वकील आणि मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाला देश कधीही विसरू शकणार नसल्याचे सांगत नितीन गडकरी यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली.
अरुण जेटली हे राज्यसभेत विरोधी पक्षाचे नेते असताना त्यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध केली होती. त्यांची भारतीय जनता पक्षाच्या विस्तारात महत्वाची भूमिका असल्याचे देखील गडकरी म्हणले.