नागपूर - येत्या ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नागपूर दौऱ्यात हिंगणा मार्गावरील १० किमी अंतराच्या मेट्रोचे लोकार्पण करणार आहेत. यानंतर ते सुभाषनगर ते सिताबर्डी मार्गावर मेट्रो प्रवासही करणार आहेत. २६ वर्षांची निकिता महाजन ही तरुणी पंतप्रधानांना हा मेट्रो प्रवास घडवून आणणार आहे.
रामेटकची रहिवासी असणारी निकिता मेकॅनिकल इंजिनिअर आहे. रामटेक मध्येच अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर ती नागपूर मेट्रोच्या एअरपोर्ट स्थानकावर स्टेशन कंट्रोलर पदावर रुजू झाली. यानंतर चालकाचे प्रशिक्षण पूर्ण करून ती आता मेट्रो चालवते.
हेही वाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे 7 सप्टेंबरला भूमिपूजन
अवघ्या ७ महिन्यांचा मेट्रो चालक म्हणून अनुभव असलेली निकिता आता पंतप्रधानांना मेट्रोची राईड घडवणार आहे.