ETV Bharat / city

नागपुरात कोरोनाने 85 जणांचा मृत्यू; नवीन 7107 बाधित

कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 69 हजार 243 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी 3 हजार 887 कोरोनातून मुक्त झाले आहे.

author img

By

Published : Apr 19, 2021, 2:29 AM IST

Nagpur corona update
नागपूर कोरोना अपडेट

नागपूर - उपराजधानीसह जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. दररोज मृत्यूच्या आकड्यात होणारी वाढ काळजाची धडकी भरवित आहे. रविवारी नव्याने 7 हजार 107 कोरोनाबाधितांची भर पडली. कोरोनाने आज 85 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी 3 हजार 887 कोरोनातून मुक्त झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात रविवारी 26 हजार 792 कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली. शहरात 4 हजार 602 तर ग्रामीण भागात 2 हजार 498 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यात नागपूर शहरात 45 जणांचा मृत्यू तर ग्रामीण भागात 33 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बाहेर जिल्ह्यातील 7 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत 6 हजार 273 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 69 हजार 243 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी 3 हजार 887 कोरोनातून मुक्त झाले आहे.

पूर्व विदर्भात कोरोनाने 151 जण दगावले आहेत. यामुळे नागपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही कोरोनाचे थैमान घातले आहे. 6 जिल्ह्यात रुग्णसंख्या 12 हजारांवर जाऊन पोहोचली आहे.

हेही वाचा-महाराष्ट्राच्या मदतीसाठी भारतीय रेल्वेची 'ऑक्सिजन एक्सप्रेस' धावणार

जिल्हानिहाय नवीन कोरोनाबधितांचे प्रमाण

  • भंडारा - 1,244
  • चंद्रपूर- 1,584
  • गोंदिया -757
  • वर्धा- 988
  • गडचिरोली- 656
  • एकूण कोरोना बाधित - 12, 336

यासोबतच 6 हजार 790 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. पूर्व विदर्भात दररोज मिळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी 22.87 टक्क्यांवरून दोन दिवसात 27.44 इतकी झाली आहे.

हेही वाचा-हृदयद्रावक..! पुण्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू

नागपूर जिल्ह्यात 18 एप्रिलनुसार कोरोना अपडेट

  • पूर्व विदर्भात -151 मृत्यू
  • नागपूर जिल्हा- 85 मृत्यू
  • कोरोना बाधित - 7 हजार 107 (नागपूर शहर 4602, नागपूर ग्रामीण 2498)
  • कोरोनामुळे झालेले मृत्यू -85 (शहरात 45, ग्रामीण 33, जिल्ह्याबाहेर 7)
  • कोरोना मुक्त झालेले -3987
  • कोरोना चाचण्या -26 हजार 792
  • सक्रिय कोरोना रुग्ण - 69 हजार 243

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.