ETV Bharat / city

नागपूरात नवीन 5,661 कोरोना बाधित रुग्ण; 69 जणांचा मृत्यू

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना शहरात आरोग्य व्यवस्था कमकुवत ठरत आहे. नागपूर शहराचा भार उचलणाऱ्या जीएमसी आणि आयजीएमसी दोन्ही शासकीय रुग्णलायत परिस्थिती बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे

author img

By

Published : Apr 13, 2021, 6:17 AM IST

lockdown
lockdown

नागपूर - सोमवारी आलेल्या कोरोनाच्या अहवालात 5 हजार 661 बाधितांची भर पडली. तर 69 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना शहरात आरोग्य व्यवस्था कमकुवत ठरत आहे. नागपूर शहराचा भार उचलणाऱ्या जीएमसी आणि आयजीएमसी दोन्ही शासकीय रुग्णलायत परिस्थिती बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्य व्यवस्था बळकट करा, आम्ही उपचार करायला तयार आहे, अशी निवासी डॉक्टर हे स्वतः रुग्णांना विनवणी करताना दिसून आले.

बाहेर जिल्ह्यातील पाच रुग्णांचा मृत्यू-
नागपूर जिल्ह्यात दोन दिवस आर्टिपीसीआर चाचणी बंद ठेवण्याच्या निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. यात मागील 24 तासात 17 हजार 47 नमुने तपासण्यात आले आहेत. यात 3 हजार 641 शहरात तर 1279 रुग्ण ग्रामीण भागात मिळून आले. यात 37 शहरातील तर 27 हे ग्रामीण भागात रुग्ण दगावले आहे. तेच बाहेर जिल्ह्यातील पाच रुग्ण हे कोरोनामुळे मृत्यू पावल्याची नोंद आहे. यात सक्रिय रुग्णाची संख्या मागील काही दिवसात सातत्याने वाढत असल्याने 57 हजार 819 जण हे बाधित असल्याचे मिळून आले. यात कोरोनाची वाढती संख्या ही तीन लाखाचा दिशेने वाटचाल करत आहेत.

हेही वाचा-फडणवीसांचा पवार पॅटर्न: पंढरपूरमध्ये भर पावसात सभा, यापूर्वी जयंतरावांनी राबवला होता हा पॅटर्न

सहा जिल्ह्यात 99 जणांचा मृत्यू
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मृत्यू आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यात सहा जिल्ह्यात 99 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूरात 5 हजार 661, भंडारा येथे 1596, चंद्रपूर जिल्ह्यात 974, गोंदिया 576, वर्धा 692, तेच गडचिरोली जिल्ह्यात 150 जण हे कोरोना बधितांची भर पडल्याने 9 हजार 449 जण बाधित मिळून आले. तर 5140 जण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर घटला असून पॉझिटिव्ह रुग्णांची वाढत आहे.

हेही वाचा-'काही दिवसांत महाविकास आघाडीचा कार्यक्रम करेक्ट करणार'

संसर्ग रोखण्यासाठी प्रोटोकॉल पाळण्याचा सूचना-

वाढती कोरोनाची रुग्णसंख्या पाहता केंद्रीय पथकाने काही ठोस पावले उचलण्यास सूचना केल्या आहेत. यात विशेष म्हणजे मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करत संसर्ग रोखण्यासाठी प्रोटोकॉल पाळण्याचा सूचना दिल्या आहेत. यामुळे केंद्रीय पथकाच्या सूचनांची किती अमलबाजवणी होईल आणि रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश मिळेल याकडे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.