ETV Bharat / city

किरकोळ वादातून भाच्याने केला मामाचा खून...नागपुरात कौटुंबीक वाद शिगेला - nephew killed his maternal uncle

क्षुल्लक करणातून काल एका मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना ताजी असताना आता कौटुंबीक वादातून भाच्याने मामाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाचपवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारसे नगर परिसरातील कुंभारपुरा या ठिकाणी ही घटना घडली आहे.

nagpur crime news
किरकोळ वादातून भाच्याने केला मामाचा खून...नागपुरात कौटुंबीक वाद शिगेला
author img

By

Published : Nov 27, 2020, 5:17 PM IST

नागपूर - क्षुल्लक करणातून काल एका मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना ताजी असताना आता कौटुंबीक वादातून भाच्याने मामाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारसे नगर परिसरातील कुंभारपुरा या ठिकाणी ही घटना घडली आहे. मृताचे नाव अतुल सहारे( वय ५८) असून विकास गुणवंत साखरे असे आरोपीचे नाव आहे. पाचपावली पोलिसांनी त्याला अटक करून तपासाला सुरुवात केली आहे. खुनाची घटना दारूच्या नशेतून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत अतुल याच्यावर पाच गुन्ह्यांची नोंद असून त्याच्यावर याआधी खुनाच्या गुन्ह्याची देखील नोंद आहे.

किरकोळ वादातून भाच्याने केला मामाचा खून...नागपुरात कौटुंबीक वाद शिगेला

पोलीस अधिकारी किशोर नगराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अतुल सहारे दारूच्या नशेत आरोपी विकासच्या घरी गोंधळ घालत होता. यासंदर्भात विकासला माहिती मिळाल्यानंतर त्याने अतुल सहारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या अतुलने विकासला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या विकासने देखील प्रतिहल्ला केला. यामध्ये अतुल गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती समजताच पाचपावली पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने अतुलला रुग्णालयात हालवण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले आहे. यानंतर पाचपावली पोलिसांनी गुन्हा नोंदवत विकासला अटक केली.

मृत व्यक्ती सराईत गुन्हेगार

मृत अतुल सहारे हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर या आधी खुनाच्या गुन्ह्यांसह इतरही गुन्ह्यांची नोंद आहेत. तर आरोपी विकासचा गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत अतुल सध्या मोमीनपुरा भागातील एका हॉटेलमध्ये कामाला होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमीच घरात वाद घालायचा. रोजच्या भांडणाना कंटाळून विकासने त्याला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने मारहाण केली असून यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.