ETV Bharat / city

गंगा-जमुना वस्तीत भुयार-तळघर सापडल्याचा पोलिसांचा दावा खोटा - ज्वाला धोटे - गंगा-जमुना वस्तीत भुयार

नागपूर शहरातील गंगा जमुना या ठिकाणी असलेल्या एका इमारतीत दोन भुयार सापडले असल्याचा दावा शुक्रवारी (दि. 29) लकडगंज पोलिसांनी केला आहे. लहान मुलींना लपवण्यासाठी या भुयारांचा उपयोग केला जायचा, असा दावा खुलासा पोलिसांनी केला होता. त्यानंतर शनिवारी (दि. 30) वारांगनाच्या हक्कांसाठी पोलिसांच्या विरोधात लढा देत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्वाला धोटे यांनी पोलिसांच्या या दाव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्वाला धोटे

author img

By

Published : Oct 30, 2021, 8:46 PM IST

नागपूर - शहरातील वारांगनाची वस्ती म्हणून ओळख असलेल्या गंगा जमुना या ठिकाणी असलेल्या एका इमारतीत दोन भुयार सापडले असल्याचा दावा शुक्रवारी (दि. 29) लकडगंज पोलिसांनी केला आहे. लहान मुलींना लपवण्यासाठी या भुयारांचा उपयोग केला जायचा, असा दावा खुलासा पोलिसांनी केला होता. त्यानंतर शनिवारी (दि. 30) वारांगनाच्या हक्कांसाठी पोलिसांच्या विरोधात लढा देत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्वाला धोटे यांनी पोलिसांच्या या दाव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी खुलासा केल्याप्रमाणे त्यांनी दोन भुयारी मार्ग शोधले आहेत तर ते भुयार जमिनीच्या आत असायला हवे होते, असे भुयार प्रत्येकाच्या घरात असू शकतात, असे त्या म्हणाल्या. ज्या अल्पवयीन मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी ते भुयार शोधले आहेत, त्यावर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्वाला धोटे

लकडगंज पोलिसांनी राजस्थान येथील पूर्व इतिहास असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या माहितीवरून भुयार शोधण्याची कारवाई केली होती. ज्यानंतर आज ज्वाला धोटे यांनी भर पत्रकार परिषदेत लकडगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक पराग पोटे आणि शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यावर आरोप केले आहेत. गंगाजमुनाची जागा भाजप समर्थित बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालायची असल्याने हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे.

काय आहे प्रकरण

काही वर्षांपूर्वी राजस्थान येथील एका अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी तिची विक्री वीस लाख रुपयांमध्ये केली होती. त्यानंतर काही महिने त्या मुलीला गंगा जमुनाच्या याच भुयारांमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी एका ग्राहकाच्या मदतीने त्या मुलीने गंगाजमुना वस्तीतून पळ काढला होता. पोलिसांच्या मदतीने त्या मुलीला राजस्थान येथे परत पाठवण्यात आले होते. मात्र, तिच्या नातेवाईकांनी परत तिचा सौदा करण्याचा प्रयत्न केला. पण, संधी साधून ती मुलगी पळून नागपूरला आली. तिने पोलिसांशी संपर्क केला. त्यावेळी त्या मुलीने एका घरात अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी दोन भुयार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्तांच्या आदेशाने दोन महिन्यांपूर्वी गंगाजमुना वस्ती सील

दोन महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने गंगाजमुना वस्ती सील करण्यात आली आहे. आता या परिसरातील काही भाग सार्वजनिक ठिकाण म्हणून पोलिसांनी घोषित केला आहे. गंगाजमुना वस्ती पोलिसांनी सील केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून वारांगना आणि पोलिसांमध्ये अनेक वेळा संघर्ष झालेला आहे.

हे ही वाचा - धक्कादायक... वारंगणांच्या वस्तीत सापडले दोन गुप्त भुयार, अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी व्हायचा उपयोग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.