नागपूर - खासदार नवनीत राणा ( Rana couple hanuman chalisa recite at nagpur ) यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ( NCP hanuman chalisa recite nagpur ) काही अटी शर्थींवर नागपुरातील रामनगर चौकातील हनुमान मंदिरात ( Ramnagar Hanuman temple ) चालीसा पठणासाठी ( Hanuman Chalisa in Nagpur ) परवानगी दिल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. यासोबतच लाऊडस्पीकर लावण्याची ( Navneet rana Nagpur ) परवानगी नाकारण्यात आली आहे. वाद टाळण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि नवनीत राणा यांना मंदिर प्रवेशासाठी वेगवेगळा वेळ देण्यात आला आहे. यात सर्वात आधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून हनुमान चालीसा पठण होईल. ते निघाल्यानंतर राणा दाम्पत्याला विमानतळावरून निघण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
हेही वाचा - देशाचे 'रोडकरी' नेते नितीन गडकरी यांचा वाढदिवस, अरुंद रस्त्याच्या महालातील गडकरी कसे झाले देशाचे नेते
दरम्यान राणा दाम्पत्याला नागपूर विमानतळावरुन मंदिर पर्यंत रॅली काढण्याची परवानगी नाकारली आहे. त्याच मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसनेही हनुमान चालीसा पठनाची परवानगी मागितली होती. त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठणासाठी वेगवेगळ्या वेळी देऊन कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी पोलीस विभागाने घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राणा दाम्पत्यांनी प्रक्षोभक वक्तव्य करू नये, ही अटही पोलिसांनी घातली आहे. यासठी राष्ट्रवादीला 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे.
आधी 12 वाजता राष्ट्रवादीचा हनुमान चालीसा पठण होईल. त्यांचा कार्यक्रम संपल्यावर राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा पठणासाठी 2 वाजताचा वेळ देण्यात आला आहे. दोन्ही पक्षांना अटी शर्थी घालण्यात आल्या असून, अटी शर्थींचे उल्लंघन झाल्यास कारवाई होणार, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राणा दाम्पत्य दोघांच्याही हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला भोंग्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.
हेही वाचा - Nagpur : नागपुरातील बालकांना एचआयव्ही लागण प्रकरण; मानवधिकार आयोगाची मुख्य सचिवांना नोटीस