नागपूर - शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे निश्चीत पण त्याची घोषणा आज म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि नवाब मलिकांनी व्यक्त केले.
हिवाळी अधिवेशनाच्या मागील ५ दिवसांमध्ये विरोधकांनी सरकारला विविध मुद्यांवरुन कोंडीत पकडण्याच प्रयत्न केला. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफी या मुद्यांवरुन अधिवेशनात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यासंदर्भात सरकारची नेमकी भुमीका काय याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान, शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा निश्चित होणार आहे. मात्र, ही घोषणा आजच म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होईल की नाही हे सांगणे कठीण असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. याशिवाय मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात देखील अधिवेशन आटोपताच शीघ्र कारवाई होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
हेही वाचा - फडणवीस सरकारमध्ये ६६ हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर?