ETV Bharat / city

Nana Patole Criticized Eknath Shinde : आज कंपनी नेली, उद्या मुंबईला गुजरातमध्ये नेतील; नाना पटोले यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

author img

By

Published : Sep 14, 2022, 1:29 PM IST

Updated : Sep 14, 2022, 1:40 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ( Prime Minister Narendra Modi ) हस्तक म्हणून राहायला मला आवडेल असं वक्तव्य केलं होतं. मुळात त्यांनी जनतेचे हस्तक असायला पाहिजे, अशी टीका ( Nana Patole criticized the Chief Minister ) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी केली आहे.

Nana Patole Criticized Eknath Shinde
Nana Patole Criticized Eknath Shinde

नागपूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ( Prime Minister Narendra Modi ) हस्तक म्हणून राहायला मला आवडेल असं वक्तव्य केलं होतं. मुळात त्यांनी जनतेचे हस्तक असायला पाहिजे अशी टीका ( Nana Patole criticized the Chief Minister ) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी केली आहे. ते आज नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते. केंद्र सरकार सांगतील असे मुख्यमंत्री वागत आहेत. गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न असल्याने उद्या मुंबई सुद्धा गुजरातला गेल्यास नवल वाटायला नको, अशा शब्दात नाना पाठवले यांनी भारतीय जनता पक्षसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका ( Nana Patole criticism of Chief Minister Eknath Shinde ) केली आहे.

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला नेले - आधीच महाराष्ट्राचे पाणी गुजरातला नेले आहे. आता कंपन्या देखील गुजरातला पळवल्या जात आहे. तर भविष्यात मुंबई देखील गुजरातला घेऊन जातील असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. गेलेली कंपनी महाराष्ट्रात परत यायला पाहिजे असं ते म्हणाले आहेत. जी कंपनी गेली त्यामुळे लाखो लोकांना इथे रोजगार मिळणार होता. अशा मोठ्या कंपन्यांना गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप त्यांनी केला आहे.

आज कंपनी नेली, उद्या मुंबईला गुजरातमध्ये नेतील; नाना पटोले यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

सांगलीत साधूंच्या हत्येवर सवाल - कोरोनाच्या काळात पालघर मध्ये दोन साधूंना मारण्यात आलं होतं. त्यावेळी भाजपने मोठा गौदवा केला होता. आता भाजपचे गृहमंत्री आहेत हिंदू सम्राट म्हणून घेणारे सत्तेत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था उरल्याचं दिसत नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. एवढंच नाही तर देशात लोकशाही शिल्लक राहिली नसून केवळ आपल्या स्वतःच्या मस्तीसाठी केंद्र, राज्यातील सरकार चालवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राहुल गांधींच्या यात्रेची भगवान रामाशी तुलना - कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत यात्रा काढणारे पहिले भगवान श्री राम होते. त्यानंतर शंकराचार्य, रामदास स्वामी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा केली. आता या यादीत चौथा नंबर हा राहुल गांधी यांचा आहे असं नाना पटोले म्हणाले आहेत. राहुल गांधी यांना हिंदुत्वाचा प्रमाणपत्र देणारे भाजप कोण आहे असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची पातळी आता भाजप आणि त्यांच्या पिलावळांची राहिल्याने असल्याचा देखील ते म्हणालेत आहेत.

Last Updated : Sep 14, 2022, 1:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.