ETV Bharat / city

Nana Patole Hanuman Chalisa Recitation : राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून सुरू; नाना पटोलेंचा निशाणा

author img

By

Published : Apr 16, 2022, 6:48 PM IST

Updated : Apr 16, 2022, 9:43 PM IST

मनसेकडून (MNS) होत असलेले हनुमान चालीसा पठन (Hanuman Chalisa Recitation) म्हणजे भक्तीचे बाजारीकरण करण्याचे काम सुरू आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हनुमान चालीसा पठनवर बोलताना भाजपवरही (BJP) जोरदार हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी चढवला आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

Nana Patole
नाना पटोले

नागपूर - मनसेकडून (MNS) होत असलेले हनुमान चालीसा पठन (Hanuman Chalisa Recitation) म्हणजे भक्तीचे बाजारीकरण करण्याचे काम सुरू आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हनुमान चालीसा पठनवर बोलताना भाजपवरही (BJP) जोरदार हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी चढवला आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. भोंगा वाजवायचा (Loudspeakers) असेल तर महागाईच्या विरोधात वाजवा, बेरोजगारीच्या विरोधात वाजवा, गरिबी आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नाबद्दल वाजवा, असाही सल्ला पटोले यांनी दिला.

प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

धार्मिक तेढ निर्माण करून ज्या पद्धतीने द्वेष निर्माण करण्याचे काम भाजपने केला आहे. आज हनुमान चालीसा पठन करणे निश्चितपणे चुकीचे नाही. पण एक दिवस हनुमान चालीसा वाचून ज्या पद्धतीचा प्रदर्शन करून बाजारीकरण करण्याचा प्रयत्न आहे ते चुकीचा आहे. मी पण रोज हनुमान चालीसा वाचतो, पण त्याचे प्रदर्शन करत नाही, असेही टोला पटोले यांनी लगावला.

कोल्हापूरमधून भाजपाच्या केंद्र सरकारचा निषेध - फुले, शाहू महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे, कोल्हापूरच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने धर्माच्या नावावर मत मागण्याचा प्रयत्न केला आहे. महागाई असो बेरोजगारी असो की शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. देशाला आर्थिक खाईत घालण्याचे काम हे भाजप सरकारने केले आहे. या सगळ्या विषयातुन लक्ष भटकवण्याचे कोल्हापूरच्या भूमीत करण्यात आले. मात्र, पुरोगामी महाराष्ट्राने कोल्हापूरमधून एक संदेश केंद्राच्या भाजप सरकारला दिलेला आहे. कोल्हापुरातून पोट निवडणुकीच्या निकालात जयश्री जाधव या चांगल्या मतांनी निवडून येताना दिसत आहे असेही नाना पटोले यांनी दिले.

काँग्रेसची स्थानिक स्वराज संस्थेतबाबत भूमिका स्पष्ट - या निवडणुकीत एकत्रित लढल्याने यश आले, पुढे एकत्र लढणार आहे का यावर काँग्रेसची भूमिका मांडताना म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याबाबतीत भूमिका स्पष्ट आहे. विधानसभा आणि लोकसभेत बद्दलची भूमिका अजून ठरली नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने जे काम कोरोनाच्या काळात केले आहे. त्याचे यश कोल्हापूर निवडणूकीच्या यशावरून पाहायला मिळत आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोळशाचा पुरवठा न झाल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्य अंधारात जात आहे. केंद्र सरकारचे धोरण देशाला आर्थिक खाईत ढकलण्याचे सुरू आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाल्याने सगळ्या स्तरावर केंद्र सरकारचा निषेध होत असल्याची टीका नाना पटोले यांनी केला.

सरसंघचालक यांनी केंद्राच्या धोरणावरही बोलावे - सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात अखंड भारत निर्माण करायचा आहे. अखंड भारत करायचा असेल तर निश्चितपणे करा पण धार्मिक तेढ निर्माण व्हायला नको याची काळजी त्यांनी घ्यावी. मोहन भागवत यांना बोलायचे असेल तर केंद्र सरकारच्या धोरणावर बोलावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

उत्सव साजरे करा पण बाजारीकरण करू नका - शिवसेनेकडूनही आरती केली जाणार आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले की, प्रत्येकाने आपआपल्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करायला पाहिजे. पण जाहीरातबाजी करायची गरज नाही. आम्ही सगळेच उत्सव साजरे करतो, पण आता जी बाजारीकरणाची प्रथा सुरू झालेली आहे. ती प्रथा चुकीचे आहे, असेही भाष्य नाना पटोले यांनी केले.

Last Updated : Apr 16, 2022, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.