ETV Bharat / city

पदवीधर निवडणूक : नागपुरात काँग्रेस, भाजपच्या उमेदवारांनी भरला अर्ज

नागपूर विभागातून पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते, तसेच दोन्ही उमेदवारांनी या मतदार संघात विजयाचा दावा केला आहे.

graduate constituency election
काँग्रेस, भाजपच्या उमेदवारांनी भरला अर्ज
author img

By

Published : Nov 12, 2020, 5:31 PM IST

Updated : Nov 12, 2020, 5:47 PM IST

नागपूर - राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नागपूर विभागात होत असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाकडून अभिजित वंजारी यांनी तर भारतीय जनता पक्षाकडून महापौर संदीप जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही पक्षांना बंडखोरीचा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सर्व काही आलबेल असल्याचे दोन्ही पक्षांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही बंडखोरीबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. तरीही दोन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा करत शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.

नागपुरात काँग्रेस, भाजपच्या उमेदवारांनी भरला अर्ज
भारतीय जनता पक्षाचा अभेद्य किल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथमच काटे की टक्कर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने संपूर्ण ताकद लावत दमदार उमेदवार देण्याच्या प्रयत्न केला आहे. तर भारतीय जनता पक्षाने यावेळी महापौर संदीप जोशी सारख्या अनुभवी आणि संघटनेवर पकड असलेल्या तरुण उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे.

आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी सर्वात आधी काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज सादर केला. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, माजी मंत्री रमेश बंग यांच्यासह अनेक आमदार आणि नगरसेवक उपस्थित होते.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय-

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात यावेळी काँग्रेसला यश अपेक्षित असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. नवीन मतदार याद्या या काँग्रेसकरिता फार उपयोगी सिद्ध होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. अभिजित वंजारी हे सर्वात लोकप्रिय उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार, त्याच्याशी आम्हाला काहीही घेणे-देणे नसल्याचे ही थोरात म्हणाले.

काँग्रेसचा उमेदवार दमदार; भाजपचा गड उद्ध्वस्त होणार -

जुना इतिहास काहीही असला तरी यावेळी नागपूर विभागात परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे पक्ष संघटनेच्या जोरावर काँग्रेसही निवडणुकीत अगदी आरामात विजय संपादन करणार, असा दावा त्यांनी व्यक्त केला आहे. तर गेल्या ५० वर्षात भाजपचा हा किल्ला अभेद्य राहिला असला तरी यावेळी काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी तो किल्ला उद्ध्वस्त करण्याच्या रणनितीने निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, आणि भाजपचा हा गड उद्ध्वस्त होणार, असा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

भाजपकडून महापौर संदीप जोशींचा अर्ज-

काँग्रेस नंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार विकास महात्मे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संदीप जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. गेल्या ५० वर्षाचा गड राखण्यासाठी मोठी जबाबदारी संदीप जोशीवर आलेली आहे. त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे, त्यामुळे या निवडणुकीत ते विजय मिळवणारच असा दावा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

हे सरकार विदर्भ विरोधी - मुनगंटीवार

विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची वैधता संपून अनेक महिने लोटले आहेत. मात्र या कुंभकर्णी सरकार अजूनही झोपेत आल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. विदर्भाच्या हक्काचे हिवाळी अधिवेशन मुंबईला पळवून सरकारने घोर विदर्भ विरोधी असल्याचे दाखवून दिले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संदीप जोशींकडे संघटन कौशल्य-

भारतीय जनता पक्षाने यावेळी विद्यमान आमदार प्राध्यापक अनिल सोले यांच्या ऐवजी महापौर संदीप जोशी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. ते उच्च शिक्षित असून त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. त्याच्या जोरावर ते ही निवडणूक अगदी आरामात जिंकणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Last Updated : Nov 12, 2020, 5:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.