नागपूर - नागपुरात एका तरुणीने सेव्ह स्पिचलेस ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांची भाषा समजून त्यांना आपलंसं करून घेण्याचा विडा उचलला आहे. जिथे अनेक कुत्रे हे रस्त्यावर होणाऱ्या अपघातात जीव सोडतात, त्या जखमी कुत्र्यांवर उपचार करून त्यांना हक्काचे घर उपलब्ध करून दिले. जिथे त्यांचे संगोपन केल जात आहे. मागील अनेक वर्षांपासून स्मिता या मुका प्राण्यांच्या चेहऱ्यावर 'स्मित हास्य' फुलवण्यासाठी झटत आहेत. काय आहे धडपड ती जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून..
एक असं घर जिथं न बोलणाऱ्याची भाषा समजून दिला जातो आधार.. तरुणीचा कौतुकास्पद उपक्रम - श्वानांचा जीव वाचवण्यासाठी मोहीम
नागपुरातील एक तरुणी स्वतःचा ट्रॅव्हल एजन्सीच्या कामातून वेळ काढत या मुक्या प्राण्याचे जीव वाचवण्यासाठी एक मोहीम राबवत आहे. तिने या मुक्या आणि भटक्या श्वानांना जिव्हाळ्याचे घर उपलब्ध करून दिले आहे. या घरात सध्या 138 श्वान असून त्यांची सर्वोतोपरि काळजी घेतली जात आहे. सुरवातीला एकट्याने सुरू केलेल्या या कामात काही कॉलेज तरुण आणि नोकरीवर असणाऱ्या प्राणीप्रेमींची मदत लाभली आहे.
![एक असं घर जिथं न बोलणाऱ्याची भाषा समजून दिला जातो आधार.. तरुणीचा कौतुकास्पद उपक्रम save stray dogs life](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14087342-thumbnail-3x2-dog.jpg?imwidth=3840)
save stray dogs life
नागपूर - नागपुरात एका तरुणीने सेव्ह स्पिचलेस ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांची भाषा समजून त्यांना आपलंसं करून घेण्याचा विडा उचलला आहे. जिथे अनेक कुत्रे हे रस्त्यावर होणाऱ्या अपघातात जीव सोडतात, त्या जखमी कुत्र्यांवर उपचार करून त्यांना हक्काचे घर उपलब्ध करून दिले. जिथे त्यांचे संगोपन केल जात आहे. मागील अनेक वर्षांपासून स्मिता या मुका प्राण्यांच्या चेहऱ्यावर 'स्मित हास्य' फुलवण्यासाठी झटत आहेत. काय आहे धडपड ती जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून..
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
Last Updated : Jan 4, 2022, 4:59 AM IST