ETV Bharat / city

Nagpur University Convocation Ceremony : नागपूर विद्यापीठाचा 109 वा दीक्षांत समारोह बुधवारी; यांना मिळाली डी लिट पदवी - Nagpur University

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचा 109 व्या दीक्षांत समारोहाचे 25 मे रोजी (बुधवारी) आयोजित करण्यात आले ( Nagpur University Convocation Ceremony ) आहे. यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत.

Nagpur University Convocation Ceremony
नागपूर विद्यापीठाचा 109 वा दीक्षांत समारोह
author img

By

Published : May 23, 2022, 6:20 PM IST

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचा 109 व्या दीक्षांत समारोह 25 मे रोजी आयोजित करण्यात आला ( Nagpur University Convocation Ceremony ) आहे. यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत. यावर्षी विविध विभागाच्या अभासक्रमात 110 प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना 151 गोल्ड, 9 सिल्वर पदके आणि 29 पारितोषकांसह 189 पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दिली आहे.

डॉ. दयाराम लालवानी यांना डी लिट - पदक तालिकेत सर्वाधिक 8 सुवर्ण पदक आणि दोन पारितोषिके हे बीए एलएलबीची विद्यार्थीनी अपराजिता गुप्ताला दिले जाणार आहेत. तर एमबीएची विद्यार्थीनी आरजु बेगने 7 पदके पटकावली आहेत. तर यावर्षीची डी लिट पदवी ही डॉ. दयाराम लालवानी यांना बहाल केली जाणार आहे.

गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे निकालाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ नोंदवण्यात झाली आहे. त्याचा परिणाम दीक्षांत सोहळ्यात दिसून येईल. पदवी आणि पदव्युत्तर पदव्यांमध्ये 20 टक्क्यांची वाढ आहे.

कुणाला किती मेडल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून बीए एलएलबीचे शिक्षण पूर्ण करणारी विद्यार्थीनी अपराजिता गुप्ताला सर्वाधिक दहा पदके दिली जाणार आहेत. जी.एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी आरजु बेगने एमबीए प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तिला आठ पदके दिली जाणार आहे. याशिवाय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून एमएससी (रसायनशास्त्र) अभ्यास पूर्ण करणारी निधी शाहू हजने पाच पदके पटकावली आहेत. त्यापाठोपाठ मधुकरराव वासनिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी धारगवेला 5 पदके बहाल केली जातील.

189 गोल्ड मेडलची लयलूट - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचा 109 व्या दीक्षांत समारोहात एकूण 151 गोल्ड मेडलची लयलूट केली जाणार आहे. 110 विद्यार्थ्यांना 151 गोल्ड मेडल दिले जाणार आहेत. तर, 9 विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल देऊन गौरविण्यात येईल. याशिवाय 29 विद्यार्थ्यांना कॅश प्राईज दिले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तीन मेडलची वाढ झाली आहे.

हेही वाचा - Nagpur Animal Costume competition : नागपूर पशुसंवर्धन विभागातर्फे 130व्या स्थापना दिवसनिमित्त प्राण्यांची वेशभूषा स्पर्धा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.