ETV Bharat / city

sharad pawar - समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार, शरद पवार यांचा विदर्भातील व्यापाऱ्यांना शब्द

आज नागपुरात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (Nag Vidarbha Chamber of Commerce program) तर्फे संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात व्यापारी आणि उद्योजकांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना त्यांना येत असलेल्या समस्या सांगितल्या. यावर शरद पवार यांनी व्यापारी आणि उद्योजकांच्या सर्व तक्रारी नोंद केल्या व लवकरच मुंबईमध्ये नागपूरच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचा शब्द दिला.

Vidarbha Chamber of Commerce Sharad Pawar
व्यापार समस्या शरद पवार नागपूर
author img

By

Published : Nov 17, 2021, 9:45 PM IST

नागपूर - राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) विदर्भ दौऱ्यावर आहे. आज नागपुरात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (Nag Vidarbha Chamber of Commerce program) तर्फे संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांची उपस्थिती होती. यावेळी व्यापारी आणि उद्योजकांनी शरद पवार यांना त्यांना येत असलेल्या समस्या सांगितल्या. यावर शरद पवार यांनी व्यापारी आणि उद्योजकांच्या सर्व तक्रारी नोंद केल्या व लवकरच मुंबईमध्ये नागपूरच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचा शब्द दिला.

हेही वाचा - Sharad Pawar on Violence : त्रिपुरामधील घटनेचे महाराष्ट्रात रिऍक्शन, यामागे षडयंत्र तर नाही? - शरद पवार

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित या संवाद कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (ncp leader Praful Patel) हे देखील सहभागी झाले होते. यावेळी व्यापारी आणि उद्योजकांनी शरद पवार यांच्या समोर त्यांना येत असलेल्या समस्यांचा पाढा वाचला. राज्य सरकारच्या अनेक धोरणांमुळे व्यापार करणे कठीन जात असल्याने एक तर व्यापार बंद करावा किव्हा शेजारच्या राज्यात स्थलांतरित होण्याशिवाय पर्याय नसल्याचे गाऱ्हाणे व्यापाऱ्यांनी मांडले. यावर शरद पवार यांनी व्यापारी आणि उद्योजकांच्या सर्व तक्रारी नोंद केल्या व प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचा शब्द दिला.

कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे. कोकण दौरा आटोपल्यानंतर त्यांनी विदर्भावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. आजपासून शरद पवार यांच्या नागपूर आणि विदर्भ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस ते नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

विदर्भातील उद्योजकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच आजचा संवाद कार्यक्रम आवर्जून आयोजित करण्यात आला होता. तुमच्या सर्व मागण्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः मुंबईत गेल्यानंतर एका बैठकीचे आयोजन करेल, ज्यामध्ये त्या त्या विभागाचे मंत्री आणि सचिवांसोबत चर्चा केली जाईल. त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. प्रादेशिक असमतोल दूर करून एक समान विकास करण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या सरकारमध्ये विदर्भाला नेतृत्वाची संधी मिळाली होती, मात्र त्या राजकर्त्यांनी व्यापारी आणि उद्याजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही केले नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

नितीन गडकरी यांच्या कामाची केली स्तुती

शरद पवार यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची तोंडभरून स्तुती केली आहे. केंद्रात केवळ एकच मंत्री असे आहेत की, ते विकासाच्या बाबतीत भेद करत नाहीत. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किव्हा नेत्यांनी विकासाच्या संदर्भात मागणी केल्यानंतर नितीन गडकरी त्यांना कधीही नाउम्मीद करत नसल्याचे उद्गार शरद पवार यांनी गडकरी यांच्या कामाची प्रशंसा करताना काढले.

हेही वाचा - अन्नदाता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांचे नागपुरात अन्नत्याग आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.