ETV Bharat / city

Nishid Wasnik Arrested : मोस्ट वॉन्टेड निशीद वासनिकला नागपूर पोलिसांनी केली अटक; दोन हजारपेक्षा अधिक लोकांची केली आर्थिक फसवणुक - मोस्ट वॉन्टेड निशीद वासनिक

दोन हजार लोकांची 40 कोटी रुपयांनी फसवणूक केल्यानंतर तो फरार झाला होता. या दरम्यान निशिदचे त्याचा सहकारी महादेव पवार यांच्यासोबत वाद झाले. फरार असतानाच निशिदने संदेश लांजेवार आणि गजानन गुणगुणे या दोन आरोपींच्या मदतीने माधव पवारचे नागपुरातून अपहरण करत त्याची वाशीम जिल्ह्यातील मालेगाव जवळ गोळ्या घालून हत्या केली होती.

नागपूर पोलिसांनी जप्त केलेले साहित्य
नागपूर पोलिसांनी जप्त केलेले साहित्य
author img

By

Published : Feb 20, 2022, 4:04 PM IST

Updated : Feb 20, 2022, 4:11 PM IST

नागपूर - इथर ट्रेड एशिया कंपनीच्या नावाने शेकडो लोकांची 40 कोटी रुपयांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्या मोस्ट वॉन्टेड निशीद वासनिकला नागपूर पोलिसांनी लोणावळ्यातून अटक केली आहे. आरोपी निशीद वासनिकने अवघ्या एका वर्षात दोन हजार पेक्षा जास्त जणांना डिजिटल करंन्सीच्या नावावर फसवणूक केल्यानंतर पसार झाला होता. नागपूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे लोणावळ्यातून अटक केली आहे. पोलिसांनी निशिदकडून चार लक्झरी गाड्या, एक पिस्तूल, काही जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने, मोबाइल, रोख रक्कम यासह 1 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

माहिती देताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार

निशीद वासनिकने पुण्यातील काही गुन्हेगारांच्या संरक्षणात लोणावळा या ठिकाणी एका डुप्लेक्समध्ये लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पहाटे दोन वाजता नागपूर पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने लोणावळा येथील त्याचे डुप्लेक्सवर छापा मारला आणि निशिद वासनिक, त्याची पत्नी प्रगती वासनिक, हत्या प्रकरणातील आरोपी संदेश लांजेवार आणि गजानन गुणगुणे यांच्यासह एकूण अकरा जणांना अटक केली आहे.

  • रक्कम चौपट करण्याचे दिले होते आश्वासन

निशीद वासनिकने त्याचा सहकारी महादेव पवार याच्यासोबत मिळून इथर ट्रेड एशिया नावाने ऑनलाइन प्लॅटफॉर्म (वेबसाईट) तयार केले होती. इथर म्हणजेच डिजिटल करेन्सीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत रक्कम चौकट करता येते, असे आमिष दाखवून त्याने गुंतवणूकदारांकडून तब्बल 40 कोटी रुपये गोळा केले होते. मात्र गुंतवणूकदारांनी पैशासाठी तगादा लावल्यानंतर तो एप्रिल 2021 पासून फरार झाला होता. नागपूर पोलिसांनी 17 एप्रिल 2019 रोजी निशिद आणि त्याच्या साथीदारांनी विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला होता.

  • सहकाऱ्याची केली हत्या

दोन हजार लोकांची 40 कोटी रुपयांनी फसवणूक केल्यानंतर तो फरार झाला होता. या दरम्यान निशिदचे त्याचा सहकारी महादेव पवार यांच्यासोबत वाद झाले. फरार असतानाच निशिदने संदेश लांजेवार आणि गजानन गुणगुणे या दोन आरोपींच्या मदतीने माधव पवारचे नागपुरातून अपहरण करत त्याची वाशीम जिल्ह्यातील मालेगाव जवळ गोळ्या घालून हत्या केली होती. हत्येच्या प्रकरणानंतर नागपूर पोलिसांची शोध मोहीम वाढवली होती. मात्र अनेक ठिकाणी छापे घालूनही निशिद वासनिक पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

  • फसवणुकीचा उद्योग सुरू

काही आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशातील पंचमढी येथे गुंतवणूकदारांसाठी एक सेमिनार आयोजित करून पुन्हा फसवणुकीचे उद्योग सुरू केल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आपल्या हेरांचे जाळे त्याच्या अवतीभवती विणले.

  • थगबाज निशीद वासनिकचा प्रावस

धक्कादायक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी नागपुरात आलेल्या निशिदने लवकर श्रीमंत बनण्याच्या नादात नागपुरातील काही गुन्हेगारांसोबत ओळखी वाढवली होती. तो कोळसा तस्करांसोबत कार्यरत झाला होता. कोळसा तस्करीच्या व्यवसायात वाद होऊन त्याने नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरात एका उपसरपंचाची हत्या केली होती. त्यामुळे अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणारा तरुण गुन्हेगारी जगताच्या नादी लागून दोन हत्या आणि दोन हजार पेक्षा जास्त लोकांच्या फसवणुकचा आरोपी बनला आहे.

हेही वाचा - Pimpri Chinchwad Crime : Whats App सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दिल्ली आणि छत्तीसगड येथील तरुणींची सुटका

Last Updated : Feb 20, 2022, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.