ETV Bharat / city

पावसाची नागपूरकडे पाठ; विदर्भातील पूढील काही दिवस कोरडे जाणार - no rain for the next few days in Nagpur

राज्यात काही ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसात विदर्भ, नागपूर परिसरात पाऊस पडणार नाही, अशी माहिती दिली आहे.

पावसाची नागपूरकडे पाठ
author img

By

Published : Aug 25, 2019, 1:14 PM IST

नागपूर - प्रादेशिक हवामान विभागाने येत्या काही दिवसात विदर्भ, नागपूर परिसरात पाऊस पडणार नाही, अशी माहिती दिली आहे. ऑगस्ट महिना उलटून जात असतानाही विदर्भात हवा तसा पाऊस झालेला नाही. अशातच हवामान विभागाच्या या अंदाजाने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

पावसाची नागपूरकडे पाठ; विदर्भातील पूढील काही दिवस कोरडे जाणार

नागपूरकडे पावसाने फिरवली पाठ...

ऑगस्ट संपत आला आहे, तरिही नागपूर परिसरातून पाऊस बेपत्ता आहे. गेल्या आठवड्याभरापासून विदर्भ कोरडा पडलेला आहे. यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता. जूनच्या अखेरच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली होती. त्या कालावधीत चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र, जुलै महिना संपल्यानंतर पावसाने जणू दडीच मारली. यामुले शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पर्जन्यमानाचा विचार केल्यास इतर जिल्ह्यांमधील पर्जन्यमान हे सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट असल्याचे हवामान खात्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे. आता मुसळधार पावसाची शक्यता कमी असून आवश्यक असलेले पर्जन्यमान झालेले नाही. मात्र मान्सून परतीच्या काळात हि तूट भरेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी दिली आहे.

Intro:पाऊसाने फिरवली पाठ; विदर्भात पाऊसाठी पर्जन्यमान नाही

ऑगस्ट च्या मध्यानात पाऊस जणू बेपत्ताच झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून विदर्भ कोरडा पडलेला आहे. यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला. जूनच्या अखेरच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली होती. त्या कालावधीत चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र, जुलै महिना संपल्या नंतर पावसाने जणू पाठच फिरवली आहे.त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. Body:पर्जन्यमानाचा विचार केल्यास इतर जिल्ह्यांमधील पर्जन्यमान हे ९० टक्क्यांहून कमी आहे. त्यामुळे नागपूर सह विदर्भातील ईतरही जिल्ह्यांमध्ये तूट असल्याचे हवामान खात्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे. आता मुसळधार पाऊसाची शक्यता कमी असून मुसळधार पाऊसाठी आवश्यक असलेल पर्जन्यमान कमी आहे त्यामुळे सध्या तरी मुसळधार पाऊस पडणार नाही अशी माहिती प्रादेशिक हवामन खात्यानि दिली आहे

बाईट-मोहनलाल शाहू, संचालक, प्रादेशिक हवामान विभाग
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.