नागपूर - शहरात 'माळी समाजाच्या समस्यांचा लोकजागर' या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात गडकरी यांनी आरक्षणावर भाष्य केले आहे. माणूस आरक्षणाने नाही, तर कर्तृत्वाने मोठा होतो, असे गडकरी यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा... राज ठाकरेंच्या प्रस्तावावर शरद पवारांनी केले मोठे विधान! म्हणाले...
मी ज्या जातीत आहे त्याला आरक्षण नाही., कारण आम्हाला आरक्षण मिळाले असते तर मी शिक्षक असतो किंवा कुठल्या तरी कार्यालयात बाबू असतो. माणूस जातीने नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. नागपूर येथे 'माळी समाजाच्या समस्यांचा लोकजागर' या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
हेही वाचा... नाणारच झालं तेच आरेच होईल - उध्दव ठाकरे
ज्या जातीचे अधिक मंत्री तितका त्या जातीचा विकास खुंटतो - गडकरी
मला अनेक जातींच्या कार्यक्रमात निमंत्रण येतात आणि मंत्रिमंडळात आमच्या जातीचे मंत्री नाहीत असे म्हटले जाते., मात्र ज्या जातीचे जितके अधिक मंत्री असतात तितका त्या जातीचा विकास खुंटतो, असे गडकरी यावेळी म्हणाले. आरक्षण घेऊन कधीच विकास झाला नाही. इंदिरा गांधींना कोणते आरक्षण मिळाले होते. आरक्षण देणे चुकीचे नाही, मात्र आरक्षणाने विकास सुद्धा होत नाही, असे रोखठोक विधान गडकरी यांनी केले.