नागपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध ठिकाणी चाचणीचे प्रमाणही वाढविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेकडून आता मोबाईल टेस्टिंग बसेसची सुरूवात करण्यात आली आहे. मनपा आयुक्त व महापौरांनी हिरवा झेंडा दाखवत या उपक्रमाची सुरूवात केली. या बसेसची एकूण संख्या १० इतकी असून त्या माध्यमातून झोन निहाय चाचणी केली जाणार आहे. शहरातील परिस्थिती लक्षात घेता या चाचणीव्दारे मोठा फायदा होणार आहे.
वाढती कोरोना स्थिती लक्षात घेता अनेक महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. याच अनुशंगाने नागपूर महानगरपालिकेकडूनही आता मोबाईल टेस्टिंग बसेसची सुरूवात करण्यात आली आहे. शहरातील वाढती कोरोना रूग्णसंख्या लक्षात घेता मनपाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसारच आज महानगरपालिकेत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी व महापौर संदिप जोशी यांच्या हस्ते टेस्टिंग बसेसचे उद्घाटन करत हिरवा झेंडा दाखवण्यात आली. या बसेसच्या माध्यमातून शहरातील झोन निहाय घरोघरी जावून चाचणी केली जाणार आहे. शिवाय चाचणीत विलंब होवू नये यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सांगितले.
सद्यस्थितीत एकूण १० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस प्रत्येक झोनमध्ये जावून चाचणी करणार आहे. सोबतच या डॉक्टरांचा चमू देखील असणार आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या चाचणीत वाढ होवू मनपा या उपक्रमाव्दारे मोठी मदत होईल, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली. शिवाय जास्तीत जास्त नागरिकांनी चाचणी करावी, असे आवाहनही आयुक्तांकडून करण्यात आले आहे. यावेळी महापौर संदिप जोशी, मनपा परिवहन सभापती बाल्या बोरकर यांची प्रामुख्याने उपस्थित होती.