ETV Bharat / city

नागपूर मनपाची कारवाई, 15 दिवसांत हजारो किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त

प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होताना दिसत नसल्याने नागपूर महानगर पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने एक मोहीम उघडली आहे. त्या अंतर्गत गेल्या 15 दिवसांमध्ये हजारो किलो सिंगल युज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.

nagpur mnc seized single use plastic
प्रतिबंधित पिशव्या जप्त नागपूर
author img

By

Published : May 19, 2022, 7:28 AM IST

नागपूर - सिंगल युज प्लास्टिक पिशवी पर्यावरणासाठी घातक आहे. तरी सुद्धा नागपूर शहरात विविध दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर होताना दिसत आहे. अनेक प्रकारचे प्रयत्न केल्यानंतरसुद्धा प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होताना दिसत नसल्याने नागपूर महानगर पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने एक मोहीम उघडली आहे. त्या अंतर्गत गेल्या 15 दिवसांमध्ये हजारो किलो सिंगल युज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.

कारवाईचे दृश्य

हेही वाचा - Hedgewar Smriti Bhavan : गेल्यावर्षी दोन दिवस नागपुरात मुक्कामी होता दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख

देशातील कोणत्याही शहराला स्वच्छ, सुंदर बनवायचे असले तर पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. या विषयावर बोलणारे अनेक भेटतील, मात्र कृती सर्वांची शून्य आहे. म्हणून नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक/आयुक्त राधाकृष्ण बी यांच्या आदेशानुसार सिंगल युज प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन देखील आयुक्तांनी केले आहे. मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे विशेषतः रस्त्यावरील फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल मार्केटमधील फुलांच्या दुकानांची तपासणी करून प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात येत आहेत.

दीड महिन्यात 2 हजार 139 टन प्लास्टिक जप्त - नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात ही मोहीम करण्यात येत आहे. गेल्या दीड महिन्यात तब्बल 2 हजार 139 टन प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 132 केसेस करण्यात आले असून, 6 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर 2 हजार 130 दुकाने तपासण्यात अली आहेत.

पाच वर्षांतील कारवाईचा लेखाजोखा - 23 जून 2018 पासून प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून आज पर्यंत म्हणजे 5 वर्षांत 3 हजार 132 केसेस रजिस्टर करण्यात आले असून, 1 कोटी 63 लाख 25 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, पाच वर्षांत 47 हजार 347 टन प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - ११० व्या तुकडीतील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थीचा दीक्षांत समारोहातील पथसंचलानाचे फोटोस्

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.