नागपूर - उपराजधानी नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या कहर पाहता तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी मनपा आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील दुसऱ्या लाटेचा अनुभवानंतर गृह विलगीकरण बंद करत आतापासून इन्स्टिटय़ूशनल विलगीकरणात पहिल्या टप्प्यात तब्बल 400 बेडचे नियोजन केले. यासह महत्वाचे पाऊले उचलत उपाययोजना केल्या असल्याचा आढावा घेतला ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने....
मनपा आयुक्तांची प्रतिक्रीया नागपूर महानगरपालिकेने ओमायक्रॉन (Omicron Variant) या नवीन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर पूर्ण तयारी केली आहे. विमानाने बाहेरून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या गाईडलाईननुसार उपाययोजना केल्या जात आहे. त्यामध्ये बाहेरून विमानाने येणाऱ्या प्रवाश्यांसाठी आरटीपीसीआर असणे बंधनकारक आहे. चाचणी नसल्यास दोन दिवस त्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवणार आहे. त्यांचा कोरोनाचाचणी अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी दिली आहे. गृहविलगीकरण बंद करणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मोथुन शहरांना मागे टाकत दररोज 5 ते 7 हजार रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे चित्र राहिले आहे. त्यानंतर परिस्थिती सामान्य होताना रुग्णसंख्या घटली आहे. मागील दोन ते तीन महिन्यात रुग्ण संख्या कमीच आहे. सध्याच्या घडीला केवळ 40 पॉझिटिव्ह रुग्ण आहे. पण ओमायक्रॉनमुळे आता नव्याने मिळणाऱ्या रुग्णांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गृहविलगीकरण बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे.
विलगीकरणासाठी हे असणार ठिकाण
इन्स्टिट्यूशनल विलगीकरण्यासाठी आमदार निवास ताब्यात घेतले आहे. मिहानमधील एम्स हॉस्पिटल आणि नागपूर मनपाचे इंदीरा गांधी रुग्णालयात सर्व मिळून साधारण 400 वर बेडचे नियोजन केले आहे. गरजेनुसार वाढवले जाईल. पण बायबरोड किंवा रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उपाययोजना केल्या जातील. त्या संदर्भात लवकरच बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
लहान मुलांसाठी व्यवस्था अंतिम टप्प्यातराष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसमध्ये लहान मुलांसाठी सोयी सुविध निर्माण केल्या जात आहे. आयसीयूसह 200 बेड निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा जो धोका होता त्यांच्यासाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ओमायक्रॉनची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सिजनची गरज आणि उपाययोजना शासकीय धोरणानुसार ठरवले जाईल. मानकापूरमध्ये 125 मेट्रिक टनचे सर्वात मोठे सिलेंडर टॅंक बसवण्यात आले. जीएमसी याठिकाणी सुद्धा ऑक्सिजन साठवण्यासाठी दोन मोठे लिक्विड टॅंक उभारले आहे. त्यातील एक टणक कार्यान्वित होण्यासाठी उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजनेत दुसऱ्या लाटेच्या तुलनेत लाटेच्या दीडपट बेड क्षमता आणि ऑक्सिजन क्षमता वाढवण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेचा अनुभवावरून ऑक्सिजन सुविधा पीएसए प्लांट उभारले असल्याचेही राधाकृष्णन बी यांनी सांगितले.