ETV Bharat / city

९० किमी वेगाने धावली माझी मेट्रो; सिताबर्डी ते खापरी मेट्रो स्थानकाचा प्रवास फक्त २० मिनिटात - नागपूर मेट्रो

नागपूरकरांना सुखद आणि वेगवान प्रवासाचा अनूभव देण्यासाठी 'माझी मेट्रो'ने वेगाची चाचणी दिली आहे. यात मेट्रो उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे.

माझी मेट्रो
author img

By

Published : Sep 14, 2019, 4:12 PM IST

नागपूर - महामेट्रोच्या रिच-१ या मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली आहे. नागरिकांच्या सोयी - सुविधांसाठी आणि सुरक्षेच्या अनुषंगाने काम प्रगतीपथावर असताना सामान्य नागरिकांकडून मेट्रोची गती वाढविण्याची मागणी केली जात होती. नागरिकांच्या मागणीला अनुसरुन आरडीएसओद्वारे सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्थानकादरम्यान ऑसीलेशन ट्रायल घेण्यात आली आहे. महामेट्रोद्वारे चार हजार पोती मेट्रो रेल्वेत भरून ९० किमी प्रती तासाने मेट्रो चालवण्यात आल्याची माहिती आहे.

माझी मेट्रोची चाचणी

९७० प्रवाशांच्या वजना इतकी म्हणजे ६३ टन रेतीची पोती रेल्वेमध्ये भरण्यात आले होते. यानंतर गाडीत काही यंत्राच्या साहाय्याने गतीमार्यादा आणि प्रवासा दरम्यान होणाऱ्या कंपनाची नोंद घेण्यात आली. 'आरडीएसओ'च्या मापदंडानुसार ही चाचणी घेण्यात आली आहे. सुरुवातीला पूर्णपणे रिकाम्या आणि नंतर पूर्ण वजनाने भरून ५० किमी वेगाने मेट्रो चालविण्यात आली. हळूहळू वेग वाढवण्यात आला, त्यानंतर ताशी ९० किमीपर्यंत चालविण्याची परीक्षाही मेट्रोने उत्तीर्ण केली आहे. या परीक्षणासाठी डीएमसी-ए फर्स्ट बोगी, टीसी फर्स्ट बोगी आणि डीएमसी-बी फर्स्ट बोगीवर ब्रॅकेटिंग करण्यात आले होते. तसेच गतिमापक सेन्सर आणि यावर नियंत्रण ठेवणारी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली होती.

हेही वाचा - 'खबरदार... पाकिस्तानचा कांदा आणलात तर आम्ही मार्केट जाळू'

'आरडीएसओ' पथकाने गाडीच्या विविध भागात सेन्सर्स बसवले होते, यातून मिळणारी माहिती संकलित करण्यात आली आहे. या टेस्ट ड्राईव्ह दरम्यान प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, रायडरशीप इंडेक्स, आपातकालीन ब्रेक व्यवस्था सारख्या मानकांचीदेखील यावेळी चाचणी करण्यात आली.

Intro:महामेट्रोच्या रिच-१ या मार्गावर प्रवासी सेवा सुरु झाली आहे... नागरिकांच्या सोयी सवलती आणि सुरक्षेच्या अनुषंगाने काम प्रगतीपथावर असताना सामान्य नागरिकांकडून मेट्रोची गती वाढविण्याची मागणी केली जात होती...नागरिकांच्या मागणीला अनुसरून आरडीएसओ द्वारे सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान ऑसीलेशन ट्रायल घेण्यात आली आहे....महामेट्रो द्वारे चार हजार पोती मेट्रो ट्रेन मध्ये भरून ९० किमी प्रती तासाने मेट्रो चालवण्यात आली आहेBody:९७० प्रवाश्यांच्या वजना इतकी म्हणजे ६३ टन रेतीची पोती ट्रेन मध्ये भरण्यात आले होते....गाडीत काही यंत्राच्या साहाय्याने गतीमार्यादा आणि प्रवासा दरम्यान होणाऱ्या कंपनाची नोंद घेण्यात आली....आरडीएसओ'च्या मापदंडानुसार ही चाचणी घेण्यात आली...सुरुवातीला पूर्णपणे रिकाम्या आणि नंतर पूर्ण वजनाने भरून ५० किमी वेगाने मेट्रो चालविण्यात आली....हळूहळू वेग वाढवीत त्यानंतर ताशी ९० किमीपर्यंत चालविण्याची परीक्षाही मेट्रोने उत्तीर्ण केली आहे....या परीक्षणासाठी डीएमसी-ए फर्स्ट बोगी, टीसी फर्स्ट बोगी आणि डीएमसी-बी फर्स्ट बोगीवर ब्रॅकेटिंग करण्यात आले होते तसेच गतिमापक सेन्सर आणि यावर नियंत्रण ठेवणारी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली होती... 'आरडीएसओ' पथकाने गाडीच्या विविध भागात सेन्सर्स बसवले होते, यातून मिळणारी माहिती संकलित करण्यात आली आहे....या टेस्ट ड्राईव्ह दरम्यान प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, रायडरशीप इंडेक्स, आपातकालीन ब्रेक व्यवस्था सारख्या मानकांचीदेखील चाचणी करण्यात आली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.