नागपूर - कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध उपाय सांगितले जात आहे. ऐरवी जिमच्या माध्यमातून व्यायाम करत शरीर सुदृढ राखण्यासाठी प्रत्येकजन प्रयत्न करत असे. मात्र, लॉकडाऊनमुळे जिम बंद करण्यात आल्या. परंतु अनलॉक झाल्यानंतरही जिम बंदच आहेत. महाराष्ट्र शासनाने जिम सुरू करण्यासाठी तात्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी नागपूरचे महापौर संदिप जोशी यांनी केली.
या मागणीसाठी नागपुरातील संविधान चौकात व्यायाम करत त्यांनी आंदोलन केले. शिवाय राज्यात दारूची दुकाने सुरू होवू शकतात, तर जिम का नाही ? असा सवालही महापौरांनी उपस्थित केला.
राज्यात हळूहळू सर्वच व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून परवानगी दिल्या जात आहे. असे असले तरी जिम व्यवसाय मात्र अजूनही बंदच आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपुरातील जिम सुरू करा. या मागणीसाठी महापौर संदिप जोशी व जिम व्यावसायिकांकडून आंदोलन करण्यात आले. नागपुरातील संविधान चौकात व्यायाम करत हे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर जर राज्यातील दारूची दुकाने सुरू होवू शकतात तर जिम का नाही ? असा सवालही महापौर संदिप जोशी यांनी उपस्थित केला.
गेल्या काही महिन्यापासून सर्वसामान्य कोरोनामुळे त्रस्त आहेत. अशावेळी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टर व WHO कडून देखील व्यायाम करण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, जिमच बंद असल्याने व्यायाम करायचा तरी कुठे ? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. शिवाय याच जिमच्या व्यवसायावर अनेकांचे पोट आहेत. अशावेळी जिमच बंद असल्याने या जिम व्यावसायिकांचा उदरनिर्वाह होणार कसा ? त्यामुळे जिम तात्काळ सुरू करा, अशी मागणीही महापौर संदिप जोशी यांनी केली आहे. शिवाय देशात सर्वत्र जिम सुरू आहेत. मात्र महाराष्ट्रातच बंद आहेत. त्यामुळे जिम बंद करून महाराष्ट्र शासन तरूणांना मानसिक दुविधेत टाकत असल्याचा आरोपही यावेळी महापौरांनी केला. त्यामुळे याचाच निषेध म्हणून नागपुरातील २२२ जिम समोर असे आंदोलने सुरू असल्याचेही महापौर संदिप जोशी यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन सर्वसामान्यांना व्यायामापासून दूर ठेवत असल्याचे हा आंदोलन करत असल्याचे महापौर संदिप जोशी यांनी सांगितले. शिवाय जिम पुढील ३ दिवसात सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तिव्र असेल असेही महापौरांनी सांगितले. या आंदोलनात जिम व्यावसायिक व नियमीत व्यायाम करणारे तरूण देखील उपस्थित होते.