ETV Bharat / city

'महापौरांच्या आदेशामुळेच गिरीश वर्मा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू'

महापौरांनी त्या भागात राहत असलेल्या नागरिकांचे म्हणजे ऐकण्याआधीच कारवाईचा आदेश दिल्याने गिरीश वर्मा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांनी गिरीश वर्मा यांचा मृतदेह महापालिका मुख्यालयात आणून महापौर दयाशंकर तिवारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

nagpur
nagpur
author img

By

Published : Feb 9, 2021, 7:36 PM IST

Updated : Feb 9, 2021, 7:42 PM IST

नागपूर - शहरात राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)ला १४०.७७ एकर जमीन ३० वर्षासाठी लीजवर दिली आहे. मात्र या प्रस्तावित जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. यासंबंधी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. महापौरांनी कारवाईचा आदेश दिल्यानंतर त्या ठिकणी घर बांधून राहत असलेल्या गिरीश वर्मा नामक व्यक्तीला हृदयविकाराच्या तीव्र झटका आला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. महापौरांनी त्या भागात राहत असलेल्या नागरिकांचे म्हणजे ऐकण्याआधीच कारवाईचा आदेश दिल्याने गिरीश वर्मा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांनी गिरीश वर्मा यांचा मृतदेह महापालिका मुख्यालयात आणून महापौर दयाशंकर तिवारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

करून घेतले होते रीतसर विक्रीपत्र

मृत गिरीश वर्मा यांनी सुमारे १२ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जागेचे रीतसर विक्रीपत्र करून घेतले होते. असे असताना सुद्धा त्या भागात राहणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भातील आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिल्यामुळेच गिरीश वर्मा यांना मानसिक धक्का बसला, ज्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांसह मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी महापौर तिवारी यांनी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली होती, ज्यामध्ये त्यांनी 'साई'च्या जागेवर अतिक्रमण केलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. ‘साई‘च्या प्रस्तावित जमिनीवर झालेल्या अतिक्रमणावर त्वरित कारवाई करण्याची सूचना यावेळी आमदार प्रवीण दटके यांनी केली होती. संबंधित प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट' असून यासाठी लागणारा संपूर्ण निधी केंद्र सरकारकडून मिळत आहे.

साई म्हणजे काय?

शहरात राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणला १४०.७७ एकर जमीन ३० वर्षांसाठी लीजवर देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ६६(१०)नुसार क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रात प्रशिक्षण केंद्र व राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापना केली जाणार आहे. या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडू व प्रशिक्षकांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी मौजा वाठोडा येथील २८.४६ एकर व तरोडी खुर्द येथील ११२.२९ एकर जमीन प्रस्तावित केली आहे.

चांगले खेळाडू तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प

नागपूर शहरात चांगले खेळाडू तयार करण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वचा आहे. नागपूर सोबतच संपूर्ण विदर्भातील युवक, खेळाडू आणि प्रशिक्षकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पात शाळा, क्लब हाउस, स्विमिंग पूल, अभ्यासिका, प्रत्येक खेळाचे मैदान तसचे विविध खेळासंबंधी अनेक क्रीडा सुविधा असणार आहेत. प्रकल्पाचे काम लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी संबंधित जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे.

Last Updated : Feb 9, 2021, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.