नागपूर - गणेशोत्सवाला Ganesh Festival Nagpur 22 सुरुवात झाली असून उद्या दीड दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन Ganesh Idol Immersion केले जाईल. यावर्षी नागपूर शहरातील एकाही नदी, तलावावर बाप्पाची मूर्ती विसर्जित Ganesh idol immersion in artificial ponds करता येणार नाही. नैसर्गिक जलाशयांमध्ये विसर्जनासाठी मनाई Ganesh idol immersion Ban In Lake And River करण्याचे आदेश नागपूर महापालिकेने Nagpur Corporation या महिन्याच्या सुरुवातीला दिले होते. त्यासंदर्भात राज्य सरकारने State Government एक धोरण तयार केले. ते धोरण मुंबई उच्च न्यायालयाच्या Mumbai High Court Nagpur Bench नागपूर खंडपीठाने स्वीकारले आहे. या विषयी सुनावणी करण्यासाठी न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली होती.
नैसर्गिक पद्धतीने तयार होणाऱ्या मूर्तींच्या विक्रीलाच परवानगी गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारने State Government एक धोरण तयार केले आहे. न्यायालयाने Mumbai High Court Nagpur Bench स्वतःहून या संदर्भात याचिका दाखल करून घेतल्यानंतर राज्य सरकारकडून मूर्ती विसर्जन संदर्भातील धोरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर Mumbai High Court Nagpur Bench मांडले. धोरणानुसार राज्यात नैसर्गिक पद्धतीने तयार होतील आणि पूर्णपणे नष्ट होणाऱ्या मूर्तींच्या विक्रीला परवानगी दिली जाईल. या संदर्भात राज्य सरकार State Government येत्या काही महिन्यांत कायमस्वरूपी धोरण तयार करणार आहे. या प्रकरणातील सर्व पक्षकारांना कायमस्वरूपी धोरणासाठी आपले मत देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने High Court दिले आहेत.
महापालिकेने काय केले आहे आवाहन - राज्य शासनाने गणेशोत्सवावरील Ganesh Festival सर्व निर्बंध हटवले असले, तरी या निर्णयाची नागपूर शहरात अंमलबजावणी करता येणार नाही. त्यानुसार घरघुती गणेश मूर्तींची उंची दोन फुटांपेक्षा अधिक राहणार नाही, याची काळजी नागरिकांना घ्यायची आहे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची ४ फुटांपर्यंत असावी, मनपाने घालून दिलेल्या नियमांच्या निकषात बसणाऱ्या मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था महानगरपालिकेकडून Nagpur Corporation केली जाणार आहे.
शहरातील सर्व तलाव विसर्जनासाठी बंद - नागपूर महापालिकेचे Nagpur Corporation प्रशासक राधाकृष्ण बी यांनी दिलेल्या आदेशानुसार यावर्षी शहरातील सर्व तलाव मूर्ती विसर्जनासाठी Ganesh Idol Immersion प्रतिबंधित करण्यात आले आहेत. निकषात बसणाऱ्या गणेश मूर्ती मनपाच्या कृत्रिम टँकमध्ये Ganesh idol immersion in artificial ponds विसर्जित केल्या जातील. मात्र ज्या मूर्ती निकषात बसत नसतील, त्या मुर्तींच्या विसर्जनाची जबाबदारी मंडळांनी स्वतः घ्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. शिवाय विसर्जन कुठे आणि कसे करणार हे देखील मनपाला कळवावे लागणार आहे. या शिवाय नियमानुसार गणेशोत्सवापूर्वी मंडळांना नागपूर महापालिकेकडून Nagpur Corporation परवानगी घ्यावी लागणार आहे.