ETV Bharat / city

उपराजधानीत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले, मात्र मृत्यूंची संख्या चिंताजनक - nagpur corona in last 24 hours

आज दिवसभरात उपराजधानी नागपुरात १३४३ रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३९४८२ इतकी झाली आहे. बऱ्याच दिवसांनी नागपुरातील कोरोना रुग्णांची एका दिवसातील संख्या पंधराशेच्या आत आली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या १३४२ रुग्णांपैकी १५५ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत. तर ११७८ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. आज १८११ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.

nagpur corona update in last 24 hours
उपराजधानीत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले, मात्र मृत्यूंची संख्या चिंताजनक
author img

By

Published : Sep 7, 2020, 12:23 AM IST

Updated : Sep 7, 2020, 4:38 AM IST

नागपूर - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नागपुरातून एक दिलासादायक बातमी आली आहे. काल रविवारी काही प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली आहे. असे असले तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या नागपुरात चढतीच आहे.

आज दिवसभरात उपराजधानी नागपुरात १३४३ रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३९४८२ इतकी झाली आहे. बऱ्याच दिवसांनी नागपुरातील कोरोना रुग्णांची एका दिवसातील संख्या पंधराशेच्या आत आली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या १३४२ रुग्णांपैकी १५५ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत. तर ११७८ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. आज १८११ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.

आज पहिल्यांदाच एकूण रुग्णसंख्येपेक्षा जास्त रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २७२६८ इतकी झाली आहे. याशिवाय आज ५४ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे नागपूरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा एकूण आकडा १३१५ इतका झाला आहे. सध्या नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६९.०६ टक्के आहे.

Last Updated : Sep 7, 2020, 4:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.